Breaking News

कोहली,मीराबाई यांना खेलरत्न तर 'राही'ला अर्जुन पुरस्कार


मुंबई प्रतिनिधी

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि महिला भारोत्तोलनपटू मीराबाई चानू यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राची नेमबाज राही सरनोबतला यावेळी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी या पुरस्कारांसाठी खेळाडूंची शिफारस करण्यात आली होती. क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार दिले जात आहेत. राष्ट्रपती भवनात 25 सप्टेंबर 2018 रोजी होणाऱ्या विशेष समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. कोहलीने नुकत्याच झालेल्या भारत इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेतउत्कृष्ट कामगिरी केली होती. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ४-१ अशा फरकाने पराभूत झाला. परंतु या मालिकेत त्याने फलंदाजीने सर्व क्रिकेटरसिकांना खुश केले. विराट कोहलीने या मालिकेतसर्वाधिक ५९३ धावा केल्या.

तर मीराबाईने राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्ण कामगिरी केली होती. ४८ किलो वजनी गटातील वेटलिफ्टींग प्रकारात आपली छाप पाडत तिने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. याशिवाय, २०१७मध्ये मीराबाई चानू हिनेजागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये विश्‍वविक्रम नोंदवून जेतेपदाला गवसणी घातली होती. तिने ४८ किलो वजनी गटात १९४ किलो (स्नॅचमध्ये ८५ आणि क्लीन-जर्कमध्ये १०९ किलो) वजन उचलून भारताला दोनदशकांनंतर सुवर्णपदक मिळवून दिले. अशी कामगिरी करणारी चानू दुसरी भारतीय वेटलिफ्टर ठरली होती. २२ वर्षांपूर्वी कर्नाम मल्लेश्‍वरी हिने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण कामगिरी केली होती.