Breaking News

विनयभंग करणार्‍यास सक्तमजूरीची शिक्षा


औरंंंगाबाद : तरुणीच्या घरात शिरुन विनयभंग करणार्‍या रविंद्र अंकुश गायकवाड (वय 25,रा.छत्रपतीनगर, गारखेडा परिसर) यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरंदळे यांनी सहा महिने सक्तमजूरीची शिक्षा शुक्रवारी (दि.14) सुनावली. 22 ऑगस्ट 2016 रोजी 21 वर्षीय तरुणी आपल्या घरात काम करताना छत्रपती नगरात राहणारा रविंद्र गायकवाड हा तिच्या घरात शिरला आणि तिचा हात धरून अंगलट करीत विनयभंग केला होता. पीडितेच्या तक्रारीवरून रविंद्र गायकवाड विरूध्द जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.