Breaking News

गणपती विसर्जनासाठी जागा उपलब्ध करा, अन्यथा ग्रामपंचायत गणपती विसर्जन करू; युवासेनाचे निवेदन


गंगापूर/प्रतिनिधी
गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन हि मराठवाड्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असूनही येथे गणेशउत्सव दरम्यान गावातील सर्व रस्त्यावर खड्डे बुजवणे, नाल्याची साफसफाई करणे तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या ग्रामपंचयत कडून अपेक्षित होते.
कित्येक वर्षांपासून असलेल्या या गावात अनेक मंडळ गणपती, नवरात्र उत्सव साजरा करतात व मूर्तींची स्थापना भक्तिभावाने करत असतात परंतु अजूनही या गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी हक्काची विहीर किंवा ठिकाण 25 हजार लोकसंख्या असलेल्या गावाला नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. मागील वर्षी वैजापूर तालुक्यातील लासुरगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विहिरीत सार्वजनिक व घरगुती गणेश मूर्तींची विसर्जन करण्याची व्यवस्था ऐन वेळेवर करण्यात आली होती. परंतु आपल्याच गावात विसर्जनासाठी जागेची उपलब्धतता करून द्यावी नसता सार्वजनिक गणेशमंडळांची व घरगुती गणेशमूर्त्या ग्रामपंचयत कार्यालयात आणून विसर्जन करू असे निवेदन आज शिवसेना व युवासेना यांच्यावतीने सरपंच रश्मी मुकेश जैस्वाल यांना देण्यात आले.
निवेदन देताना शहरप्रमुख नितीन कांजूने पाटील, उपशहरप्रमुख अमोल शिरसाठ, शाखाप्रमुख युनूस शहा,उपविभागप्रमुख अजय साखळे, विजय भाले, प्रतीक खंडेलवाल, मनोज सुरासे, योगेश गवळी, सचिन इंगळे, गहिनीनाथ डिके, अशोक घोडके, चेतन वाळके, वाल्मिक वाकळे, उदय अवसरमल, अमोल लंके, संदीप शेलार, प्रकाश दाणे, राहुल रुदाक्ष आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.