Breaking News

गावांना मिळणार सामाजिक सभागृह; १५ कोटीचा निधी मंजूर


परळी, (प्रतिनिधी):- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी ग्रामविकास विभागाच्या २५१५ निधीतून परळी मतदारसंघातील १४४ गावांमध्ये सामाजिक सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, बीड जिल्हा परिषदेने नुकतीच या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान केली असून लवकरच सभागृहाच्या बांधकामाला सुरवात होणार आहे. 
ग्रामीण भागातील जनतेची गरज ओळखून ना. पंकजाताई मुंडे यांनी प्रत्येक गावांत सामाजिक सभागृह बांधण्याचा शब्द दिला होता, या शब्दांची पूर्ती करण्यासाठी त्यांनी मतदारसंघातील १४४ गावांना ग्रामविकास विभागाच्या मूलभूत विकास योजना २५१५ मधून १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. परळी तालुक्यातील ८६ गावांना ९ कोटी २० लाख तर मतदारसंघात येणा-या अंबाजोगाई तालुक्यातील ५८ गावांना ५ कोटी ८० लाख असा एकूण पंधरा कोटी रुपयांचा निधी त्यांनी दिला आहे. बीड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने या निधीला नुकतीच गेवराई तालुक्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता नुकताच बीड जिल्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी गेवराई तालुक्यात दौरा केला. या दौर्‍यादरम्यान त्यांनी केलेल्या भाष्यावर सोशल मिडीयामध्ये चांगलीच जुगलबंदी पहायला मिळत आहे. काही जणांना तर मनस्वी आनंद होवू लागला असुन विधानसभेच्या आमदारकीची माळ आपल्याच गळ्यात पडते की काय? असे वाटू लागले आहे. एकुणच पंकजाताईंच्या जादूची कांडी फिरल्यास नेमकी दांडी कोणाला बसणार? याविषयी तर्क-वितर्क लावले जात आहेत. गेवराई विधानसभा मतदार संघातील राजरंग एका वेगळ्याच दिशेनेजात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आ.लक्ष्मण पवार यांनी दोन्ही पंडित एकत्र असतांना माजी मंत्री बदामराव पंडितांना धक्का दिला होता. त्यानंतर मात्र वर्षभरापुर्वी बदामराव पंडितांनी राजकीय कुस बदलत थेट मातोश्री गाठली. शिवबंधन हाती बांधण्याची अचूक ‘वेळ’ त्यांनी साधली. बदामअबांना योग्य पक्ष मिळाला आणि पक्षालाही तडाखेबाज नेता मिळाल्याचे त्यांच्या पक्षप्रवेशाने अधोरेखित झाले.