ताराई महाविद्यालयातर्फे गणेश मंडळाला निर्माल्य बॉक्सचे वाटप


पैठण/प्रतिनिधी
गणेशोत्सवात गोदावरी नदीत होणारे जलप्रदूषण कमी करण्याच्या हेतूने संपूर्ण पैठण शहरातील गणेश मंडळांना निर्माल्य बॉक्स चे ताराई महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने वाटप करण्यात आले. प्राचार्या डॉ रंजना पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.कापड मंडई गणेश मंडळा पासून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
या मोहिमेच्या उदघाटन प्रसंगी ताराई शिक्षण संस्थेचे संचालक निमेश पटेल, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ गणेश शिंदे, प्रा गणेश इंगळे, प्रा रामेश्‍वर म्हस्के, प्रा सुनीता पाठक , मंडळाचे अध्यक्ष मनीष आठवले, दादू पटेल, दिनेश माळवे, सागर जटाळे,सागर अंदुरे,वैभव व्यवहारे, सुरज वाकोडे आदींची उपस्थिती होती.या उपक्रमाचे प्रा. वैशाली गायकवाड, प्रा. शर्वरी पैठणकर, प्रा. लहू घोरपडे, प्रा.स्वप्नील गिरगे, प्रा.रामेश्‍वर वाघचौरे, प्रा. मतीन शेख, किरण जाधव,निलेश सनवे यांनी नियोजन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अगस्ती पुरी,महेश गहाळ,योगेश पवार, विकास गव्हाणे, दत्तू निकाळजे, ऋषिकेश तवार,निखिल जाधव, सीमा सुरोसे,शीतल सूर्यवंशी,प्रियंका जहागीरदार,रेणुका मोरे, कल्याणी रोडे, प्रियंका मिसाळ, सीमा वाघमारे,कविता गायकवाड,आरती बल्लाळ, श्‍वेता परदेशी,पूजा राघव,पूजा सुखदेव, पल्लवी कंदे आदी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget