कृषी अधिकाऱ्यांनी घेतला ‘हुमणी’च्या नुकसानीचा आढावा


कोपरगाव श. प्रतिनिधी 

तालुक्यातील टाकळी गावात हुमणी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. कृषी विभागामार्फत त्याची नुकतीच पाहणी करण्यात आली. या आढावा फेरीत ‘हुमणी’चे आक्रमण कसे परतावून लावायचे, याबाबत कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला दिला. 

यावेळी टाकळी परिसरातील बाळासाहेब देवकर, अरुण देवकर, राहुल देवकर आदी शेतकऱ्यांच्या शेतात झालेल्या हुमणीच्या प्रादूर्भावाची यावेळी पाहणी कृषीविभागामार्फत करण्यात आली. हुमणी अळीसंदर्भात चर्चासत्राचे आयोजन कृषी विभागात आयोजित करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांना कृषी अधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरे दिली. जिल्ह्यात आलेल्या ‘हुमणी’च्या आक्रमणामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. या रोगामुळे ऊस पिकाचे वाटोळे झाले आहे. काही ठिकाणी पाटाचे आणि विहिरीचे आणि देऊनही हुमणी अळीमुळे ऊस पांढराफटक पडला आहे. दरम्यान, आगामी काही दिवसांतच जिल्ह्यातील कारखान्यांचे बॉयलर धडाडणार आहेत. मात्र त्यापूर्वीच ऊसावर आलेली ‘हुमणी’ची ही संक्रांत ऊसाचे वजन घटविणार का, अशी शंका ऊसउत्पादक शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. 

त्यानंतर प्रत्यक्ष टाकळी गावातील शेतकऱयांच्या शेतात पाहणीसाठी पायोनियरचे कृषी कीटकनाशक शास्त्रज्ञ भरत दवंगे, कृषी अधिकारी आढाव, सोनवणे, कोल्हे, माजी सभापती सुनील देवकर, बाळासाहेब देवकर, अरुण देवकर, मोनू राहणे, मंगेश देवकर, पोपट जगदाळे, अर्जुन वाकचौरे आदींसह अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांना ‘कॉम्बो लाईट ट्रॅप’ मोफत द्या

ऊसकार्यक्षेतील सुमारे एकशे पन्नास ते दोनशे एकर शेतीतील ऊसाला हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. ऊसासह मका, कांदा, गिन्नी गवत या सारख्या पिकांवरही याचा प्रादूर्भाव झाला असल्याचे लक्षात आहे. शासनाने शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत कॉम्बो लाईट ट्रॅप मोफत द्या.

सुनील देवकर, माजी सभापती.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget