गणेश मंडळांनी गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आवाहन


सातारा (प्रतिनिधी) : सामाजिक एकता वाढावी, विचारांची देवाणघेवाण व्हावी हा हेतू समोर ठेवून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. या गणेशोत्सवातून गरीब, होतकरु विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी आता धर्मादाय विभागाने पुढाकार घेतला असुन मंडळाकडे जमा होणार्‍या वर्गणीतून किमान एका विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मदत करण्यासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहे.

गणपती बुध्दाचा अधिष्ठाता मानला जातो. या गणेशाच्या उत्सवात सामाजातील गरीब, होतकरु मुलाला शिक्षणासाठी करता आली तर त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल. भक्तांकडून घेतल्या जाणार्‍या वर्गणीतुन एक चांगले काम करता येईल. ही संकल्पना समोर ठेवून राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी यावर्षी मंडळांना सोबत घेत हा उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हा कार्यालयांना सुचना देण्यात आल्या आहेत.

सातारा येथे सहाय्यक धर्मादाय आयुक्त ईश्वर सुर्यवंशी व सहाय्यक धर्मादाय आयुक्त प्रज्ञा सुर्यवंशी यांनी यासाठी नियोजन केले आहे. गणेश मंडळांनी गणपती मूर्तीसमोर दानपेटीबरोबरच ज्ञानपेटी ठेवण्याचे सुचविण्यात येत आहे. या ठिकाणी येणार्‍या भक्तांनी वह्या, पेन, पेन्सिल, पुस्तक असे शैक्षणिक उपयोगी साहित्य या ज्ञानपेटीत टाकायचे आहे. जमा झालेले हे साहित्य गरजवंत विद्यार्थ्यांला उपलब्ध करुन दिले जाणार आहे. या उपक्रमाबाबत मंडळाच्या पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केले आहे. या केलेल्या उपक्रमाचा अहवाल सहाय्यक धार्मादाय आयुक्त्‌ सातारा यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget