Breaking News

महावितरणच्या कर्मचाऱ्याला दोघांनी लुटले


राहुरी प्रतिनिधी

राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्याने ड्युटीवर चाललेल्या ब्राह्मणी येथील महावितरण कर्मचाऱ्याला पांडुरंग तुकाराम तेलोरे यांच्या गळ्याला दोघा जणांनी तलवार आणि लावून लुटले. या घटनेत सदर कर्मचाऱ्याच्या बोटातील सोन्याची अंगठी दोघा भामट्याने चोरून नेली. या घटनेमुळे रस्तालुटीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून थंडावलेल्या रस्ता लुटारुंनी पुन्हा डोके वर काढले आहे. ब्राम्हणी येथील तेलोरे हे महावितरण कर्मचारी राहुरी खुर्द येथे थ्री फेजचे काम करण्यासाठी १३२ के. व्हिला रात्री अकरा वाजेदरम्यान येत होते. त्यावेळी राहुरी-शनिशिंगणापूररोड गोटुंबे-तमनर, आखाडा फाटा येथे आले असता पाठीमागून अचानक पांढऱ्या रंगाच्या मारुती ८०० या चारचाकी वाहनातू तोंड बांधून दोघे आले. त्यांनी तेलोरे यांना कार आडवी लावत गळ्याला तलवार व चाकू लावत ‘आवाज केला तर ठार करु’ अशी धमकी देत अंगझडती घेतली. तेलोरे यांच्या घिशात काहीही रोख रक्कम न मिळाल्याने त्या भामट्यानी त्याच्या उजव्या बोटातील सुमारे सात ग्रॅम सोन्याची अंगठी काढून घेत चोरटे चारचाकी वाहनातून राहुरीच्या दिशेने लंपास झाले. घाबरलेल्या अवस्थेत तेलोरे हे ब्राम्हणी येथे घरी गेले. दरम्यान, आज, दि. २० सकाळी राहुरी पोलिस ठाण्यात येऊन तेलोरे यांनी तक्रार दिली आहे. दरम्यान, तेलोरे यांची दुचाकीही चोरटे घेऊन जाणार होते. पण दुचाकीचे ‘स्विच’ नादुरस्त झाल्याने चोरटयांनी ती नेली नसल्याचे तेलोरे यांनी सांगितले.