Breaking News

कोपरगावात स्वाईनफ्लूने एकाचा मृत्यू.कोपरगाव शहरातील ओमनगर भागातील  रहिवासी चिंधु हरी घुमरे वय ५९ हे टेलिफोन विभागात काम करीत असतांना  दि १ सप्टेंबर रोजी यांना अस्वस्थ  वाटु लागल्याने त्याना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले . तेथेही बरे न वाटल्याने शहरातील मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले व त्यानंतर औरंगाबाद येथील माणिक हॉस्पिटल व रिसर्च सेंटर येथे दि  ३ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.  उपचारा दरम्यान रोगाचे निदान करण्यासाठी मुंबई येथे नमुने तपासणीसाठी पाठवले असता त्याना स्वाईन फ्लू असल्याचे निष्पन्न झाले. त्या दरम्यान उपचार चालू असताना दि १४ सप्टेंबर रोजी दुपारी त्याचा मृत्यू झाला असे त्यांच्या नातेवाईकाने सांगितले.शहरात यापूर्वीही शहरात स्वाईनफ्लूने दोन बळी घेतल्याची चर्चा आहे.     
(प्रतिनिधी - संजय भवर कोपरगाव)