Breaking News

सिडकोतून महिलेचे मंगळसूत्र हिसकावले


औरंंंगाबाद : सिडको एन-9 परिसरातील प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्‍वर्य विद्यालयाकडे पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र चोरट्याने 20 हजाराचे मंगळसूत्र हिसकावले. ही घटना 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. सिडको एन-9 येथील तक्रारदार महिला नेहमीप्रमाणे सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ब्रम्हकुमारी ईश्‍वर्य विद्यालयाकडे जात होती. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या चोरट्याने तक्रारदार महिलेजवळ आपल्या दुचाकीची गती कमी करून तिच्या गळ्यातील 20 हजार रूपये विैंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी सावध असलेल्या तक्रारदार महिलेने मंगळसूत्र चोरट्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरट्यापुढे तिचा प्रयत्न असफल ठरला. चोरट्याने जोराने हिसका देवून मंगळसूत्र हिसकावून घेत पोबारा केला. या घटनेत महिलेच्या गळ्याला गंभीर स्वरूपाची जखम झाली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यावर सिडको पोलिस ठाण्याच्या निरीक्षका निर्मला परदेशी, गुन्हे शाखेच्या कर्मचाछयांनी घटनास्थळी धाव घेवून मंगळसूत्र चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत मंगळसूत्र चोरटा धुमस्टाईल वेगाने पसार झाला होता. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून मंगळसूत्र चोरट्याविरूध्द सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक पाचोळे करीत आहेत.