Breaking News

केंद्र व राज्य सरकारने शेतकरी आणि सहकाराच्या पाठीशी उभे रहावे : आ. थोरात


संगमनेर प्रतिनिधी 

तालुक्यातील जनतेसह राज्यातील सर्व ऊस उत्पादकांचा थोरात कारखान्यावर मोठा विश्वास आहे. नवीन कारखाना व विद्युत निर्मिती प्रकल्प निर्मितीचा घेतलेला धोरणात्मक निर्णय पुढील अनेक पिढ्यांसाठी मोलाचे ठरणारा आहे. सहकाराने राज्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. त्यामुळे सरकारने शेतकरी, सहकार व साखर उद्योगाच्या पाठीशी उभे राहिले, पाहिजे असे आवाहन माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन अ‍ॅड. माधवराव कानवडे हे होते. व्यासपीठावर बाजीराव खेमनर, रणजितसिंह देशमुख, इंद्रजित थोरात, रामदास वाघ, उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे, शंकरराव खेमनर, अमित पंडित, शिवाजीराव थोरात, आर. बी. रहाणे, हरिभाऊ वर्पे, मधुकरराव नवले, बाबा ओहोळ, लक्ष्मणराव कुटे, लहानभाऊ गुंजाळ, आर. एम. कातोरे, पाराजी चकोर, विश्‍वासराव मुर्तडक, नवनाथ अरगडे, संपतराव डोंगरे, सुधाकर रोहम, सोन्याबापू वाकचौरे, साहेबराव गडाख, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते. सर्वसाधारण सभेचे नोटीस वाचन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. डी. एस. भवर यांनी मागील सभेचे वृत्तांत वाचन केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांनी आभार मानले.