Breaking News

वकील हा समाजातील महत्वाचा घटक-डॉ.क्षीरसागर


बीड (प्रतिनिधी) - वकील हा समाजातील महत्वाचा घटक आहे. समाजातील अन्यायग्रस्त, वंचित लोकांना न्याय व गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देण्याचे कार्य करत असतात. बीड शहरातील वकिलांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी आ.जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवू असे प्रतिपादन युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले. 
शहरातील जिल्हा न्यायालयाच्या आवारात ई-लायब्ररी येथे बीड वकील संघाच्या अध्यक्षपदी ड.अविनाश गंडले यांची निवड झाल्याबद्दल युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी त्यांचा सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी समवेत वकील संघाचे सचिव ड.विष्णूपंत 
काळे, माजी अध्यक्ष ड.प्रविण राख, महिला प्रतिनिधी ड.पटेल मॅडम, सहसचिव ड.सय्यद साजेद, ड.नागेश तांबारे, ड.सचिन काळे, ड.बप्पा माने, ड.पटेल साहेब, ड.इम्रान पटेल, ग्रंथालय सचिव ड.विकास बडे, कार्यक्रमाचे आयोजक मुन्ना गायकवाड, सनी वाघमारे आदी उपस्थित होते.