Breaking News

जंगलराजला भद्रकाली पोलीसांचे अभय,शासकीय आवारात ओली पार्टीःवृत्तांकन करणार्या पञकाराला पोलीसांनी ठेवले डांबूननाशिक/प्रतिनिधी
राञीच्या अंधारात शासकीय आवारात ओली पार्टी करणार्या वन अधिकारी कर्मचार्यार्यांवर कारवाई करण्याऐवजीया बेकायदेशीर घटनेचे चिञीकरण करणार्या जेष्ठ पञकाराला पाच तास पोलीस ठाण्यात डांबून ठेवण्याचा पराक्रम भद्रकाली पोलीस ठाण्यात झाल्याने विविध पञकार संघटनांनी संतप्त भावना व्यक्त करून पोलीस आयुक्त डाॕ.रविंद्र कुमार सिंगल यांची भेट घेत कारवाईची मागणी केली आहे.पञकारांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करतांना लेखी तक्रार आल्यास कारवाईचे आश्वासन दिले आहे.
या संदर्भात अन्यायग्रस्त पञकार चंद्रकांत धाञक यांनी सांगितलेला सविस्तर वृत्तांत असा की बुधवार दि.२० सप्टेंबर रोजी राञी ८-८.३० वा.दरम्यान नाशिक जनमतचे संपादक स्वतः चंद्रकांत धाञक हे घरी जात असतांना गडकरी चौकातील आदिवासी विकास आयुक्तालयासमोर वनखात्याचे कार्यालयाच्या आवारात दुचाकी आणि चार चाकी गाड्यांची गर्दी दिसली.कुठलीही कार्यालयीन कामकाजाची वेळ नसताना वनखात्याच्या आवारात अवेळी एव्हढी गर्दी का झाली,याबाबत उत्सुकता जागी झाल्याने आवारात प्रवेश केला.आवारात पन्नास साठहून अधिक वनकर्मचारी आणि अधिकारी मद्यप्राशन करीत भोजनाचा आस्वाद घेताना दिसले.सदर ओली पार्टी करण्याचे कारण विचारले असता कुणा रामाराव नामक वरिष्ठ वन अधिकार्याची चंद्रपूर येथे दोन महिन्यापुर्वी बदली झाल्यामुळे बुधवारी पार्टीचे साग्रसंगीत आयोजन करण्यात आल्याची माहीती काही कर्मचार्यांनी दिली.तोपर्यंत धाञक यांनी ओली पार्टी आपल्या कॕमेर्यात कैद केली होती.ही बाब लक्षात आल्यानंतर धाञक यांना धक्काबुकी करीत कॕमेरा हिसकावून घेण्यात आला.धाञक यांनी ओळखपञ दाखवून ओळख दिल्यानंतर आणखी धक्काबुकी करीत चोर चोर अशी संभावना केली.धाञक यांनी त्यांनतर पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना भ्रमणध्वनीवर घटनाक्रम सांगितला.उपायुक्त पाटील यांनी या घटनेची तात्काळ दखल घेत भद्रकाली पोलीस ठाण्याला मदत पाठविण्याचे आदेश दिले.उपायुक्तांचे आदेश असल्याने भद्रकाली पोलीस ठाण्याचे गुन्हेपथकाचे पोलीस निरिक्षक सुर्यवंशी यांनी घटनास्थळी येऊन शहनिशा केली.आणि ओली पार्टी करणार्या वनकर्मचार्यांची चौकशी करण्याऐवजी धाञक यांना कुठलीही विचारपूस न करता गाडीत घालून पोलीस ठाण्यात आणले.आणि गुन्हेगाराला द्यावी अशी वागणूक दिल्याचा आरोप धाञक यांनी केला आहे.दरम्यान भद्रकाली पोलीस ठाण्याचा कारभार पाहणारे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मंगलसिंग सुर्यवंशी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जात असल्याने त्यांच्याकडून न्याय होईल अशी धाञक यांना असलेली अपेक्षाही पुढच्या अर्धा तासात फोल ठरली.वरिष्ठ पोलीस निरिक्षकांसमोर हे प्रकरण गेल्यानंतर सराईत गुन्हेगाराला द्यावी त्यापेक्षाही हिन वागणूक दिल्याचे धाञक यांचे म्हणणे आहे.पञकारांचा बाप फक्त पोलीस असतो,तुमचे लाड पोलीसच करतात,लोकांमध्ये तुम्हाला कवडीची किंमत नाही.मुत पिऊन आला वगैरे वगैरे असंवैधानिक भाषेत धाञक यांचा पाणउतारा करण्यात आला.धाञक हे अध्यात्मिक असून वारकरी पंथाशी संबंधित असल्याने दारूचा वासही आजवर घेतला नाही अशी माहीती दिल्यानंतर पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकार्याने माझा बापही वारकरी आहे,तरीही मी मुत पितो अशी अॕडव्हान्स माहीती दिली.
राञी बारा पर्यंत हा खेळ सुरू असताना दरम्यानच्या काळात धाञक यांच्या कॕमेर्यातील मेमरी कार्ड पोलीसांनी जप्त केले.काही पञकार पोलीस ठाण्यात आले .तडजोडीतून प्रकरण मिटवले.तोपर्यंत धाञक यांना पोलीसांच्या नजरकैदेत अडगळीच्या जागेवर बसविण्यात आले होते.राञी दोन वाजता वन अधिकार्यांचा प्रतिनिधी आणि धाञक यांच्याकडून तक्रार नसल्याचे लिहून घेण्यात आले त्यानंतर सुटका केली.पोलीस ठाण्यात उपस्थित असलेले पञकार आणि पोलीस यांनी धाञक यांना या घटनेची कुठेही वाच्यता न करण्याचा सल्ला माञ दिला.माञ झालेल्या अन्यायाची मनात तिव्र चिड निर्माण झाल्याने धाञक यांनी दुसर्या दिवशी शहरातील काही पञकार संघटनांकडे न्याय देण्याची विनंती केली.घटना समजून घेतल्यानंतर महाराष्ट्र राज्य पञकार महासंघ,पञकार संरक्षण समिती,एनजेयुएम,जिल्हा पञकार संघ,महाराष्ट्र राज्य पञकार कल्याण संघ आदी संघटनांच्या पदाधिकार्यांनी पोलीस आयुक्त डाॕ.रविंद्रकुमार सिंगल यांची भेट घेऊन न्याय देण्याची मागणी केली.वास्तविक वनखात्याच्या आवारात सुरू असलेल्या पार्टीची चौकशी करणे पोलीसांकडून अपेक्षीत होते.पोलीस आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे.
बाॕक्सः१
लोकमंथनचे सवालः
*शहरात पञकारांनी वृत्तसंकलन करायचे की नाही?*
*भद्रकाली पोलीसांनी कथित ओली पार्टीची चौकशी केली का? केली असेल तर निष्पन्न काय झाले? नसेल तर चौकशी का केली नाही?*
*पन्नास वर्ष वय असलेले जेष्ठ पञकार संपादक चंद्रकांत धाञक यांना जवळपास पाच तास बेकायदेशीरपणे डांबून का ठेवले?*
*चंद्रकांत धाञक यांच्यासह संशयीत वन अधिकारी कर्मचार्यांची मेडीकल झाली का? नसेल तर का नाही?*
*विशेष म्हणजे शासकीय कार्यालयाच्या आवारात राञीच्या ओली पार्टीला परवानगी असते का? भद्रकाली पोलीसांनी तशी परवानगी दिली होती.?*
*या एकूण प्रकरणाची नोंद भद्रकाली कुठे आणि कशी केली*
*********
***********
या संदर्भात वन मंञी सुधीर मुनगट्टीवार आणि गृहराज्यमंञी रणजीत पाटील यांनाही तक्रार करण्यात आली आहे.
********-
*******
बाॕक्सः २
पो.आयुक्त डाॕ.सिंगल सर्व स्थरावर कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून कसोशीने प्रयत्न करताना दिसतात तथापी घासात अचानक खडा आल्यानंतर भुकेचे खोबर व्हाव तसा प्रकार काही पोलीस करीत असल्याने डाॕ.सिंगल यांचे कर्तृत्व झाकोळले जात आहे.ही बाब ते स्वतःही मान्य करीत असून या प्रवृत्ती सर्व क्षेञात असून सर्व मिळून त्यांचा बंदोबस्त करू असे ते आश्वस्त करतात.