Breaking News

उपक्रमाद्वारे धार्मिक एकतेचे दर्शन


अहमदनगर (प्रतिनिधी)- मोहरम व गणेशोत्सवानिमित्त निमगाव वाघा (ता.नगर) येथे धार्मिक एकतेचे दर्शन घडवित व्यसनमुक्ती व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालयसंलग्न स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था आणि श्री नवनाथ युवा मंडळाने हा सामाजिक उपक्रम राबविला. संस्थेच्या वतीने स्थापना करण्यात आलेल्या श्री गणरायाची आरती मुस्लिम समाजातील युवकांच्या हस्तेकरण्यात आली. तसेच समाजात वाढती व्यसनाधिनता लक्षात घेता व्यसनमुक्तीवर पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या पोस्टर स्पर्धेच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश देणार्‍या पोस्टरांचा देखावा गणेशमंडळाने साकारला आहे. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, सैफ शेख, शाहिद सय्यद, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, विशाल फलके, सोमनाथडोंगरे, राष्ट्रीय कुस्तीपटू प्रतिभा डोंगरे, प्रियंका डोंगरे, सचिव मंदाताई डोंगरे, वैभव पवार, पै.स्वराज डोंगरे, अन्सार शेख आदि उपस्थित होते.