Breaking News

मागच्या सरकारला खड्डे सुध्दा बुजविता आले नाही - बागडे


करमाड/प्रतिनिधी 
टोणगांव ते कुंभेफळ रस्ता पहिले डांबरीकरण माझ्या मागील कार्यकाळात झाले होते. मात्र गेली पाच वर्षे ज्या सरकारचे आमदार होते त्यांना या रस्ताचे खड्डे बुजविता सुध्दा आले नसल्याची टीका विधानसभा अध्यक्ष फुलंब्री हरिभाऊ बागडे यांनी केली. 
शुक्रवार दि.14 सप्टेंबर रोजी टोणगांव (ता.औरंगाबाद) येथील कुंभेफळ ते टोणगांव रस्ताचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत डांबरीकरणाचे उदघाटन व आमदार निधीतून सामजिक सभागृहाचे भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष श्रीराम शेळके, बाबुराव कोळगे, सभापती राधाकिसन पठाडे,उपमहापौर विजय औताडे, गणेश दहिहंडे, अशोक पवार, साहेबराव डिघोळे, प्रकाश चांगूलपाय, शिवाजी मते, भालचंद ठोंबरे, अनुराधाताई चव्हाण, सुमिंत्रा गावंडे, रामकिसन भोसले, सुदाम ठोंबरे, भगवान चौधरी, अशोक नाब्दे, विठ्ठल सादरे, संजय दांडगे, प्रल्हाद शिंदे, अजिंक्य मदगे, सजन बागल, भगवान वाघ, शरद पुंगळे, कल्याण तुपे, सुरेश पठाडे, विठ्ठल काकडे, इश्‍वर शेळके, ज्ञानेश्‍वर शेळके, भीमराव पा. पोफळे, राजू शेळके, सरपंच अश्‍वीनी चौधरी, जयाची सरोदे उपसरपंच, त्रिंबक सरोदे पोलीस पाटील, भरत आहेर, विक्रम जाधव, सुभाष कोळगे, गणेश चौधरी, बाबासाहेब आहिरे, रवींद्र गरड, नानासाहेब चौधरी, नारायण सरोदे, तेजराव सरोदे, दिलीप सरोदे, रामनाथ अहिरे, काकासाहेब अहिरे, कृष्णा अहिरे, अनिल कोळगे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपास्थीत होते.