Breaking News

परवानाधारकांकडून काटे-वजने-मापे उपकरणांची खरेदसह दुरुस्ती करण्याचे आवाहन


सातारा (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यामध्ये वजने मापे दुरुस्ती परवाना धारकांची संख्या 26 आहे तसेच वजने मापे विक्री परवाना धारकांची संख्या 35आहे यामध्ये देखील काही परवाना धारकांकडे फक्त मेकॅनिकल वजन माप दुरुस्ती तसेच विक्री परवान आहे. या वैध परवानधारकांकडूनच वजने मापे, काटे उपकरणे यांचे दुरुस्तीचे व विक्रीचे काम वजने मापे उपयोगकर्ता यांनी करुन घेणे उचित आहे, असे असून सुध्दा काही वजने मापे उपयोगकर्ते अनअधिकृत इसामांकडून आपल्या वापरात असलेल्या काटे व वजने मापे उपकरणे यांची दुरुस्ती करुन घेत असल्याबाबत निर्दशनास आले आहे. अशा प्रकारच्या अनुचित व्यापारी प्रथेबाबत संबंधीत उपयोगकर्ता तसेच अवैध दुरुस्ती व विक्री करणार्‍या व्यक्ती यांना जबाबदार धरुन त्याच्यावरती वैधमापन शास्त्र अधिनियम 2009 व महाराष्ट्र वैधमापन शास्त्र (अ) नियम 2011 मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल.