तवा धबधबा परिसरात रोजगार निर्मिती व्हावी; सुरक्षेची व्यवस्था करा ; भाजपची मागणी


।संगमनेर/प्रतिनिधी।

संगमनेर परिसरातील पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या तवा धबधबा परिसरात रोजगार निर्मिती व्हावी त्याचप्रमाणे या परिसरात अपघात प्रतिबंधक सुरक्षा उपाययोजना तथा पर्यटन विकास कार्यक्रमाची मागणी संगमनेर भाजपतर्फे करण्यात आली आहे. संगमनेर शहरापासून २४ किमी अंतरावर देवठाण धरणाजवळ सावरगाव शिवारात 'तवा धबधबा' हे नयनरम्य स्थळ आहे. खोल दरीत झेपावणारे आढळा नदीचे पाणी मध्य प्रदेशातील भेडाघाट या सुप्रसिद्ध धबधब्याची आठवण करून देते. सदर जलप्रपात व सभोवतालचा परिसर अत्यंत प्रेक्षणीय आहे. पावसाळ्यात संगमनेर परिसरातील अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात. परंतु दुर्दैवाने या परिसरात अपघात प्रतिबंधक सुरक्षेची कोणतीही उपाययोजना नाही. याठिकाणी निसरड्या दगडावरून घसरल्यास शेकडो फूट खोल दरीत कोसळून जीवघेणा अपघात होऊ शकतो. अनेक अतिउत्साही पर्यटक निसरड्या वाटेवरून खाली उतरत धबधब्याच्या तळाजवळ जातात तसेच वेगवेगळ्या कोणातून सेल्फी घेतात, त्याचा परिणाम जीवावर बेतू शकतो. तवा धबधबापासून जवळच टाहाकारी येथे १० व्या शतकातील पुरातन आणि प्रेक्षणीय जगदंबा मंदिर तसेच पट्टा किल्ला (विश्रामगड) आहे. शासनाने जिल्हा नियोजन समिति किंवा पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून या परिसरात पर्यटन विषयक सुविधा निर्माण कराव्यात, अशी मागणी संगमनेर भाजपने उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून राज्य शासनास निवेदन पाठवून केली आहे. 

सदर निवेदन देताना संगमनेर भाजपचे ज्येष्ठ नेते राम जाजू , शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे , शहर सरचिटणीस दिनेश सोमाणी व सुदाम ओझा , प्रसिद्धी प्रमुख शिरीष मुळे, दीपक भगत, भारत गवळी, सुनील खरे, किशोर गुप्ता, शिवकुमार भांगीरे, दीपेश ताटकर, अशोक शिंदे , दिलीप रावल, जग्गू शिंदे , राहुल भोईर , कांचन ढोरे , रेश्मा खांडरे, ज्योती भोर इ.उपस्थित होते.

… रोजगार निर्मितीला होणार मदत 

या ठिकाणी सुरक्षेच्या योग्य उपाययोजना केल्यास तसेच येथील खोल घळीस जोडणारा झुलता पूल बांधण्याची गरज आहे. पाण्याजवळ जाण्यासाठी सुरक्षित पायऱ्या बांधून तवा धबधबा परिसराचा पर्यटन स्थळ म्हणून विकास केल्यास या परिसरात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होण्यास मदत मिळेल.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget