Breaking News

देश फौंडेशन तर्फे विविध पुरस्कार जाहीर


म्हसवड (प्रतिनिधी) : माणदेश फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे सर्व माणदेशी लोकांचा स्नेह मेळावा व विविध क्षेत्रातील माणदेशी रत्नांना पुरस्कार प्रदान गौरव सोहळा आयोजित केला जातो.त्याचप्रमाणे आज रविवार दि. सप्टेंबर रोजी सकाळी . वाजता अल्पबचत भवन पुणे येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला असून पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांची नावे जाहीर करण्यात आली असल्याची माहिती माणदेश फौंडेशनचे अध्यक्ष अशोक माने व उपाध्यक्ष विजयराव पिसे यांनी दिली आहे. 

माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख व आयकर आयुक्त नितीन वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली माणदेश फौंडेशनने हा गौरव सोहळा आयोजित केला असून या सोहळ्यात खालील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

माणदेश फौंडेशनतर्फे दिला जाणारा माजी स्व.यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार आरती बनसोडे यांना ,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती पुरस्कार उपजिल्हाधिकारी सुरेखा माने यांना, संत गाडगेबाबा महाराज स्मृती पुरस्कार बीजीएसचे शांतीलाल मुथा यांना, तर उद्योग क्षेत्रात नावारूपास आलेले सागर घोरपडे यांना उद्योजक पुरस्कार, वैद्यकिय सेवेत चांगले कार्य केलेबद्दल डॉ. लक्ष्मण कोडलकर यांना वैद्यकिय पुरस्कार, आदर्श गाव म्हणून किरकसाल गावाला, आदर्श माता म्हणून श्रीमती गंगूबाई ठोंबरे यांना कुस्ती क्षेत्रात यश मिळवलेले पै. किरण भगत यांना खेळाडू म्हणून पुरस्कार, कला क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेबद्दल अभिनेत्री दिप्ती सोनवणे यांना कलाकार पुरस्कार, पत्रकारिता क्षेत्रात जिल्ह्यात आपल्या निर्भिड लेखणीने वेगळा ठसा उमटवलेले जेष्ठ पत्रकार बापूसाहेब गुंजवटे यांना पत्रकारितेतला जीवनगौरव पुरस्कार, इलेक्ट्रॉनिक मिडीयातला पुरस्कार प्रियंका गोरड यांना, शिक्षण क्षेत्रातला आदर्श शिक्षक म्हणून डॉ. सी. जे. खिलारे यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. तसेच पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे व वाटर कप स्पर्धेत राज्यात उज्वल मिळवलेले टाकेवाडी, भांडवली, बनगरवाडी, वाघमोडेवाडी, भाटकी या गावांना विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर असून ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे, विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन माणदेश फौंडेशनच्यावतीने गौरवण्यात येणार आहे.

तरी या गौरव सोहळ्यास माण तालुक्यातील नागरीकांनी उपस्थित राहावे असे आवाहनही माणदेश फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

माणदेश फौंडेशनतर्फे दिले जाणार्‍या पुरस्कारांची यादी -

माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आरती बनसोडे, उपजिल्हाधिकारी सुरेखा माने, बीजीएसचे शांतीलाल मुथा, उद्योजक सागर घोरपडे, डॉ. लक्ष्मण कोडलकर, आदर्श गाव किरकसाल, श्रीमती गंगूबाई ठोंबरे, पै. किरण भगत, अभिनेत्री दिप्ती सोनवणे, पत्रकार बापूसहेब गुंजवटे, प्रियंका गोरड, डॉ. सी. जे. खिलारे, वॉटर कप स्पर्धेतील टाकेवाडी, भांडवली, बनगरवाडी, वाघमोडेवाडी, भाटकी यांचा माणदेश फौंडेशनच्या वतीने गौरव केला जाणार आहे.