Breaking News

मिरवणूकीत गोंधळ घालणार्‍यांविरूध्द गुन्हा दाखल


औरंंंगाबाद : गणपतीच्या मिरवणूकीत गोंधळ घालून दमदाटी करणार्‍या गौरव जेठालिया (वय 25, रा.भवानीनगर,जुना मोंढा), संकेत जाधव (वय 26, रा.बालाजीनगर) यांच्याविरूध्द जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 13 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता जुना मोंढा येथील गणपती मंडळाच्या मिरवणूकीत घुसून दोघांनी गोंधळ घातला होता. या प्रकरणी वैभव सदाशिव सालपे (वय 36, रा.भवानीनगर, जुना मोंढा) याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.