Breaking News

फलटण-गोंदवले गाडीची वेळ बदलण्याची मागणी


म्हसवड (प्रतिनिधी) : फलटण आगाराची रात्री सव्वा आठ वाजता सुटणार्‍या फलटण गोंदवले या गाडीच वेळापत्रक बदलण्यात यावं आगार प्रमुखांनी याचा विचार करावा अशी प्रवाशांची मागणी आहे.

फलटण हे पुण्याकडे जातानाचे मध्यवर्ती ठिकाण असून याठिकाणी चांगल्या प्रकारची वैद्यकीय सेवा उपलब्ध असल्याने अनेक वेळा अनेकांचा सतत फलटण प्रवास सुरु असतो फलटण आगारातून गेल्या अनेक वर्षांपासून फलटण गोंदवले बु ही एसटी बस रात्री सव्वा आठ वाजता फलटण मधून सोडण्यात येते व रात्री सव्वा नऊ वाजता ही बस तासाभराने दहिवडी मध्ये पोहचते त्यानंतर गोंदवलेला रवाना होते असा प्रवास असतो फलटण येतून जेजुरी सोमेश्वर, शिंगणापूर ही देवस्थाने जवळ असल्याने भाविकांना तसेच शासकीय काम उरकून दहिवडीकडे येणार्‍या प्रवाशांना ही बस मिळत नाही. फलटण मधून खासगी दुकाने, शोरूम, हॉटेल अशा ठिकाणी काम करणारांची संख्या जास्त असून हे कामगार दुधेबावी, मोगराळे, बिजवडी, पाचवड या परिसरातील असून त्यांची कुचंबणा होत आहे. त्याांना खासगी गाड्यांचा आधार घेऊन प्रवास करावा लागतो. अनेक वेळा मोगराळे घाटात निर्जन ठिकाणी अनुचित प्रकार ही घडले आहेत.