Breaking News

मराठयांनो अस्तित्वाच्या लढाईत सामील व्हा !... शेळके.

येवला ता. २१: ममदापुर (ता.येवला) येथे सकल मराठा समाजाची संघटन बैठक गुरुवार येथील मारुती मंदिर येथे  तालुकाभर सुरू असलेली मराठा संघटन परीषद व नोव्हेंबरमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळेल किंवा नाही मिळणार यानंतर समाजाची भूमिका काय पार्श्वभूमीवर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते येथील सकल मराठा मोठ्या संख्येने उपस्थित होता या बैठकीस समन्वयक समितीचे पांडुरंग शेळके पाटील, सुदाम पडवळ संतोष मढवई.प्रवीण निकम,मंगेश कदम.यांची प्रमुख उपस्थितीत होती.येथील मारुती मंदिरात घेण्यात आलेल्या या बैठकीस
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून मुजरा करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पांडुरंग शेळके पाटील होते या परिषदेत प्रमुख भाषांनान मध्ये अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने मराठा समाजाला आरक्षण व न्याय कसा मिळेलभर देण्यात आला मराठा सुध्दा असाच सहिष्णू, साधा, आपल्या विचार व ज्ञानाने परंपरेप्रमाणे चालणारा आहे. तो कोणाचेही वाईट करत नाही. इमाने इतबारे नोकरी करतो. निसर्गाच्या लहरीप्रमाणे शेती करतो. जमेल तशी प्रामाणिकपणे विठ्ठलाची, शिवाजीची यांची पूजा व उत्सव साजरे करतो. मराठी महिला निमुटपणे घरकाम करतात. मुलं असेल तशी शाळा, कॉलेज शिकून छोटी नोकरी करततात प्रत्येक निवडणुकीत नवा पक्ष, नवा उमेदवार यांच्या खोट्या आश्वासनाला बळी पाडतात याची देखील काळजी येणाऱ्या काळात घ्यायची आहे.

*मराठा का संपत चालला* 

हा चांगुलपपना मराठ्यांच्या अधोगतीला नडत असून, मराठा  सहिष्णू व चांगुलपणाने राहतो, पण बाकीचे लोक व्यापार करू लागले तेव्हा मराठा  नोकरी व चाकरी करत राहिला. महागाई वाढत चालली, घरात माणसं वाढली व नोकरीतला पैसा पुरेनासा झाला, मग शेवटी वडीलोपार्जित संपत्ती विकली. आलेले पैसेही काही दिवसात संपले.शेतकऱ्यांच्या जमिनी सावकार, धनाढ्य राजकारणी, व्यापारांनी विकत घ्यायला सुरू केल्या आणि हळूहळू मराठा हरला, कारण मराठ्यांने व्यापार केला नाही, आक्रमक वागला नाही, तो सर्वांना सामावून घेत गेला, इमाने इतबारे नोकरी व चाकरी करत राहिला. म्हणूनच मराठा लवकर जागा नाही झाला या व अश्या अनेक विषयावर चर्चा झाली.तालुक्यातील प्रत्येक मराठ्यांच्या घरात उद्योग उभा राहावा, मराठा मुलं उच्चतम स्पर्धेत यशस्वी व्हावीत यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला,असे आव्हान देखील समितीकडून करण्यात आले.


या समितीने मराठा समाजाला केलेले आव्हाने.

१)विद्यार्थ्यांनी शिक्षणावर भर द्यायचा आहे.
२)ऐकमेकांना नोकरी-व्यवसायासाठी मदत करायची आहे.
३) मराठा समाज सोबतचे जुने वाद विसरायचे आहेत.
४)"मराठा"संघटन परिषेदेला सहकार्य करायचे आहे व जमेल इतकं काम करायच आहे.
५)मराठी, राष्ट्रभाषा व इंग्रजी चा पाया पक्का करायचा आहे. 
६)वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावून घ्यायची आहे.
७)सर्वांना सोबत घेत प्रगती करायची आहे.
८)कोणत्या तरी नविन व्यवसायाची सुरूवात करायची आहे.
९)"मराठा  "सत्ता समाजात निर्माण करायची आहे.
१०) आपले मित्र कोण ? शत्रू कोण याचे भान ठेवायचे.

यावेळी ममदापुर येथील देविदास गुडघे,नंदू सोमाशे, समाधान चव्हाण,दीपक उगले,योगेश झालटे बाळासाहेब सौदाने विजय गुडघे,आण्णासाहेब सोमाशे, नवनाथ गायकवाड, अक्षय गुडघे,सोमनाथ चव्हाण निलेश नवनाथ गुडघे,गुडघे,राजू गोरख गुडघे,बाबतात्या गुडघे,ज्ञानेश्वर केरे,सुनिल शिंदे, तुषार कदम महेश केरे,धर्मा दाणे, अक्षय गुडघे, राहुल गिडगे,दिगंबर केरे,दत्तू गुडघे,राजू गुडघे आबा केरे,जनार्दन केरे.आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या परिषदेचे सूत्रसंचालन व आभार प्रकाश गुडघे यांनी केले.