Breaking News

कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन


लोणी/प्रतिनिधी 

आत्मामालिक तसेच कृषी आणि पशुसंवर्धन विभाग, अहमदनगर यांच्या सहकार्याने कृषी विज्ञान केंद्र , बाभळेश्वर येथे ६ ते ८ ऑक्टोबर २०१८ या कालावधीमध्ये कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेअसल्याची माहिती केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर यांनी दिली. या कृषी तंत्रज्ञान प्रदर्शनामध्ये शंभर स्टॉल असलेले भव्य औद्योगिक प्रदर्शन भरविण्यात येणार आहेत.यात बियाणे खते, औषधे, अवजारे, सिंचन,रोपवाटिका या क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे . शिवाय कृषी आत्मा रेशीम उद्योग, मत्स्यव्यवसाय ,दुग्धव्यवसाय ,सेवाभावी संस्था, महिला गट, शेतकरी गट यांचाही सहभाग आहे या निमित्ताने द्राक्ष डाळिंब ,ऊस, फळेभाजीपाला प्रक्रिया ,परसबाग ,सेंद्रिय शेती ,मधुमक्षिका पालन ,दुग्ध व्यवसाय, शेळीपालन ,कुक्कुटपालन बांबु शेती या विषयावर तज्ञ परिसंवादांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. सदर कार्यक्रमाचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावाअसे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.