Breaking News

शिवाजी विद्यापीठाच्या सर्व्हरवर चिनी हॅकर्सचा हल्ला


कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या सर्व्हरवर चिनी हॅकर्सनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यामुळे विद्यापीठाचे संगणीकृत काम मंदावले आहे. विद्यापीठाच्या सर्व्हरवर चिनी हॅकर्सने हल्ला केल्यामुळे सकाळपासून संगणकाधारित काम करण्यास अडचणी येत आहेत. सायबर हल्ल्यामध्ये मलेशिअस व्हायरस सॉफ्टवेअर तयार करून हॅकर्स संगणक यंत्रणा नियंत्रणाखाली आणतात. ही यंत्रणा ताब्यात आली, की गोपनीय माहिती चोरता येणे हॅकर्सना शक्य होते. एकदा संपूर्ण यंत्रणा हॅक केली, की ती पूर्ववत करण्यासाठी हॅकर्स संबंधितांकडून खंडणी वसूल करतात.