Breaking News

तलवाडा व भादली येथे छावा संघटनेचे उद्घाटन


लोणी खुर्द/प्रतिनिधी
तलवाडा(ता वैजापूर)येथे अखिल भारतीय छावा संघटनेच्या शाखेचे उद्घाटन संपन्न झाले. दि 14 रोजी झालेल्या उद्घाटनप्रसंगी अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष किशोर शिरवत व शिवाजी मार्कडे जिल्हा शहर अध्यक्ष तसेच वैजापूर तालुका अध्यक्ष किशोर मगर यांची प्रमुख उपस्थिती होती. 
तलवाडा येथे संभाजी मगर यांना शाखा अध्यक्ष तर उपाध्यक्ष तातेराव मगर, कोषाध्यक्ष मंगेश म्हस्के, सचिव ज्ञानेश्‍वर मगर यांना नियुक्ती देण्यात आली. त्याचप्रमाणे भादली येथे शाखा अध्यक्ष नारायण चव्हाण व रामेश्‍वर दाने यांनानियुक्ती पत्र देण्यात आले. 
या प्रसंगी गावचे सरपंच भाऊसाहेब मगर, लोकनिती मंचाचे दादाभाऊ मगर, जयराम काका मगर, शंकर नाना मगर, कारभारी मगर, सुनील घायवट, भानुदास मगर, बाळू आयनर, बाबासाहेब म्हस्के, बाळासाहेब मगर, दादासाहेब मगर इ व गावकरी उपस्थित होते.