Breaking News

जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीचे आयोजन


बीड, (प्रतिनिधी):- जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक अध्यक्ष, जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती तथा जिल्हाधिकारी, बीड यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २१ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली होती. तांत्रिक कारणामुळे बैठकीच्या तारखेमध्ये बदल झाला असून सुधारित तारखेनुसार ही बैठक सोमवार दिनांक २४ सप्टेंबर २०१८ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे आयोजित करण्यात आली आहे. असे चंद्रकांत सूर्यवंशी, सदस्य सचिव, जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती तथा निवासी उपजिल्हाधिकारी, बीड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.