Breaking News

धावत्या रेल्वे गाडीत चोरट्यांनी एक लाखाहुन अधिक मुद्देमाल लुटला

मनमाड / प्रतिनिधी
धावत्या रेल्वे गाडीत चोरट्यांनी एक लाखाहुन अधिक मुद्देमाला लुटल्याची घटना घडली असल्यामुळे रेल्वेगाडीतील प्रवासी धासतावले असुन रेल्वे प्रशासनाकडे सुरक्षा यत्रणा असुन देखील असा प्रकार कसा होवू शकतो असा प्रश्न प्रवाश्यांना पडला आहे.
याबाबत माहिती अशी की, गुरूवारी दि. २० रोजी सायंकाळी ६ : ५०ला मनमाड स्थानकातुन गाडी क्रं १७२०५ र्शिर्डी - काकीनाडा सुटल्यानंतर अंकाई - नगरसुल दरम्यान अज्ञात तीन ते चार २०-३० वर्षीय चोरट्यानी रेल्वे गाडीत धुमाकुळ घालत हत्याराचा धाक धाकवत प्रवाश्यांकडून लुटमार केली आहे. याच गाडीत कोच क्रं एस ८ मधुन प्रवास करणाऱ्या श्रीमती कोनात्री मंगतायारू वय ४३ गोदावरी तहसिल आंध्रप्रदेश यांच्या कडून या अज्ञात चोरट्यांनी सोन्याची चैन आणि एक सोने घातलेले काळ्या मण्याचे गठण हत्याराचा धाक दाखवत हिसकावून घेतले. एक लाख बत्तीस हजाराचा मुद्देमाल या अज्ञात चोरट्यांनी लंपास केला असुन या घटनेबाबत मनमाड लोहमार्ग पोलिस स्थानकात मंगतायारू यांनी फिर्याद दिली असुन पोलिस स्थानकात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक अर्चना क्षीरसागर करीत आहे.
२०-३० वर्षीय अज्ञात चोरट्यांनी साईनगर एक्सप्रेसमध्ये हत्याराचा धाक दाखवत विविध कोच मधिल अनेक प्रवाशांना लुटत लाखोचा माल लंपास केला. अनेक प्रवाशांनी पोलिस स्थानकात तक्रार दिले नाही. दुसरीकडे सकाळपासुनच लोहमार्ग पोलिस वरीष्ठ अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळाची पहाणी करून अज्ञात चोरट्यांची वेगाने शोध मोहीम हाती घेतले आहे.