पाटणकरांच्या वाड्यातला सुंदर, विलोेभणीय बदामी पाषाणाचा श्रीगणेश


औरंगाबाद/ प्रतिनिधी
गणपतीची विविध रूप आहेत. बाप्पाचे सर्वांग सुंदर आणि विलोभणीय असे एक रूप कासारी बाजारातील पाटणकरांच्या जुन्या वाड्यात पहायला मिळते. वंशपरंपरेने श्रींचे हे मंदीर रविंद्र पाटणकर यांच्याकडे आले असून गणपतीची सेवा करणारी त्यांची सातवी पिढी आहे. बदामी रंगाच्या पाषाणाचा हा गणेश नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध आहे.

गणपतीचे वैशिष्ट म्हणजे मूर्ती कलाकार त्याच्या कल्पनेप्रमाणे वाटेल तशी मूर्ती घडवतो. विद्येचा हा देवता प्रत्येक रूपात विलोभनीय दिसतो. कासारी बाजारातील नास गल्लीमध्ये पाटणकरांच्या वाड्यातील गणेशाचे रूप डोळ्यात साठवावे असेच आहे. वाड्याच्या खालच्या मजल्यावर गणपतीसह राधाकृष्ण आणि महादेव पार्वतीचे मंदीर आहे. तर समोर धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी मोकळी जागा आहे. वरील मजल्यावर पाटणकर कुटूँबिय राहते. काळाच्या ओघात वाड्याचे आधुनिकीकरण करण्यात आले. जुने बांधकाम जाऊन सिमेंट काँक्रीटच्या भिंती उभ्या राहिल्या. पण तिन्ही मंदीरांचा प्राचीन साज जशाच्या तसा जपण्याकडे पाटणकर कुटूँबियांनी आवर्जून लक्ष दिले. यामुळेच या वाड्यात आधुनिकता आणि प्राचीन याचा संगम दिसून येतो.
निझामपूरकरबुआंनी केले होते कौतूक
प्रसिद्ध किर्तणकार निझामपूरकरबुआ एकदा मंदीराच्या दर्शनाला आले. किर्तनासाठी ते भरपूर फिरलेले होते. पण पाटणकरांच्या वाड्यातील गणपतीची सर अन्य कोणत्याही गणपतीला आली नसल्याचे त्यांनी कबूल केले. देशभरात या पाषाणाचा गणपती कोठेच नसल्याचे त्यांनी सांगीतले होते.
परंपरेने चालत आले मंदीर 

या मंदीराबाबत ठोस माहिती कोणाकडेच उपलब्ध नाही. असे म्हंटले जाते की पाटणकरांच्या एका पूर्वजाच्या रसाळ वाणीतील भागवत ऐकण्यासाठी दूर-दूरहुन लोकं यायचे. त्यांच्या विद्वत्तेचा मान राखत एका गुजराती कुटूँबाने गणपती, राधाकृष्ण आणि महादेव पार्वतीची मंदीरे त्यांना बांधून दिले. यात सुरेख मूर्तींची प्रतिष्ठापना केली. 

रविंद्र पाटणकर बंधू मंदीराची सेवा करणारी सातवी पिढी आहे.
रोज बाप्पांची सेवा रोज सकाळी मंदीरात पूजापाठ करून आरती केली जाते. चतूर्थीला येथे अभिषेक होतो. सण-उत्सवाला गणपतीला दागिने घालून आकर्षक सजावट केली जाते. येथे गजानन महाराज प्रकट दिन, गोकुळाष्टमी, गुरूपोर्णिमा, दत्तजयंती साजरे केले जातात. श्रावणात महादेवाला दररोज रूद्रािाषेक केला जातो.


पावणारा गणपती
आमच्या वाड्यातील गणपती पावणारा असल्याची श्रद्धा असल्याने अनेक भाविक नवस बोलतात. मनोकामना पूर्ण झाल्यावर येथे दर्शनाला येतात. आमच्या घरात सुख, शांती, संपन्नता आणि यश या बाप्पामुळेच आहे.
-रविंद्र पाटणकर
बदामी रंगाचा पाषाण
मंदीरातील गणपती उजव्या सोंडेचा आहे. सोंडेने बाप्पाने एक दात धरला आहे. तर पोटाोवती नागाने पिळा घातला असून सोंडेखालीच हा नाग तोंड वर काढतांना दिसतो. मूर्तीसाठी वापरण्यात आलेल्या पाषाणाबाबत मतिान्नता आहे. बादामी रंगाचा हा पाषाण संगमरवर असल्याचा जाणवते. ही मूर्ती किमान 500-600 वर्षे जूनी असावी. पण तिची कलाकुसर, सफाईदारपणा बघताच मनात भरतो. मंदीराला लाकडी नक्षीदार दरवाजे आहेत. बाप्पाचे हे रूप नयनरम्य आहे. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget