Breaking News

चिचोंडी पाटीलयेथे रक्तदान शिबिर उत्साहात


अहमदनगर /तालुका प्रतिनिधी

चिचोंडी पाटील येथील प्रतिष्ठाण व अष्टविनायक ब्लड बँक अहमदनगर यांच्या सयुंक्त विद्यमाने गणेशोत्सव व मोहरम निमित्ताने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. मंडळाचे संस्थापक अशोक कोकाटे वमार्गदर्शक सुनील कोकाटे यांच्या प्रेरणेने हा उपक्रम गेल्या १५ वर्षांपासून स्मृती प्रतिष्ठाण राबवत आहे.यावेळी सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे (बापू ), मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या गोकुळ घुमरे व कापूरवाडीयेथील किशोरी काकडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली . प्रतिष्ठान सातत्याने रक्तदान शिबीर,आरोग्य शिबीर, वृक्षारोपण ,अंदश्रद्धा निर्मूलनाचे उपक्रम , सामाजिक विषयावरचे व्याख्याने , महिलासबलीकरण असे विविध प्रकारचे उपक्रम राबवत आहे . शिबिराचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले , भारतीय जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे, उपसभापती प्रवीण कोकाटे,सरपंच अंजनाताई पवार , यांच्याहस्ते करण्यात आले . जिल्हास्तरिय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झलेल्या भाग्यश्री इंगळे व धनश्री इंगळे या शालेय विद्यार्थी भगिनींचा व त्यांच्या पालकांचा प्रतिष्ठाणच्या वतीने सत्कार करण्यात आला .