Breaking News

शेख ताहेर खूनातील आरोपीचा अटकपूर्व जामीन नामंजूर


औरंंंगाबाद : अंगुरीबाग परिसरातील शनि मंदीराजवळ शेख ताहेर शेख कादर यास लाथाबुक्यांनी मारहाण करून खून करणाछया भानुदास सिताराम लोंखडेचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एच. पतवाडकर यांनी शुक्रवारी (दि.14) पेैटाळला. 27 ऑगस्ट 2018 रोजी अंगुरीबाग परिसरातील शनी मंदीरा समोर शेख ताहेर शेख कादर याला भानुदास लोखंडे याने शिवीगाळ करून बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी शेख ताहेरचा भाऊ शेख करीम याने दिलेल्या तक्रारीवरून भानुदास लोखंडेविरूध्द सिटीचौक पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.