Breaking News

शासन योजनांची वारी, महाविद्यालयाच्या दारी अखिल भारतीय युवक मराठा महासंघाचा उपक्रम

नाशिक :- मराठा समाजातील मागासलेल्या घटकांना समाजाच्या प्रवाहारात सामावून घेण्यासाठी विध्यार्थीना शैक्षणिक सवलती मिळाव्या यासाठी शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने महत्वपुर्ण योजना अंमलात आणल्या. या योजना मराठा विद्याप्रसारण संस्थेच्या के.टी.एच.एम. महाविद्यालयातील विध्यार्थ्यांना वर्गात जाऊन योजनेची माहिती देण्यात आली. त्यावेळी प्राचार्य रामनाथ गायकवाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना लोकराज्य शासनाचे मासिक वाटप करून त्यातील योजना आपल्या गावातील विध्यार्थीना देखील कळवावे असे आव्हान विद्यार्थांना अखिल भारतीय युवक मराठा महासंघ प्रदेश संपर्क प्रमुख तुषार जगताप यांनी केलं.


राजेश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती आणि डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता या दोन्ही योजनेअंतर्गत विविध घटकांतील विध्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळवण्यासाठी साहाय्य केले जाणार आहे.शिक्षण घेत असताना अडचणी येऊ नये या अनुषंगाने दोन्ही योजना महत्वाच्या आहे. तसेच शेतीपूरक कैशल्य प्रशिक्षण आणि छत्रपती राजाराम उद्योजकता व कैशल्य प्रशिक्षण अभियान यांच्या सारख्या महत्वाच्या योजनांचा देखील सहभाग आहे.


शैक्षणिक वर्ष २०१८ - १९ पासून इबीसी विध्यार्थीच्या ज्या पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा आठ लाख रुपये आहे अशा विध्यार्थीना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.उच्च व तंत्र शिक्षण, वैधकिय शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय अश्या विभागतील येणाऱ्या ६०५ शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या शुल्कामध्ये ५० टक्के सवलत देण्यात आली आहे.या वर्षांपासून वैधकीय आणि दंत शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना यामध्ये समावेश करण्यात आला आहे. या शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल. शिक्षण शुल्क केवळ ५० टक्के इतकी रक्कम विध्यार्थ्यांकडून घ्यावी, अन्य ५० टक्के रक्कम राज्य शासन देणार आहे.परंतु ज्या महाविद्यालयांमध्ये विध्यार्थीकडून १०० टक्के शुल्क घेण्यात आल्याच्या तक्रारी आल्यातर शासनामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. तसेच महानगरातील ( मुबंई महानगर क्षेत्र, पुणे,औरंगाबाद, नागपूर ) शिक्षण घेणाऱया विध्यर्थाना प्रतिमहा तीन हजार रुपये ( वार्षिक ३० हजार रुपये ) तर शहरव्यतिरिक्त अन्य शहरात शिक्षण घेणाऱ्या विध्यर्थाना प्रतिमहा फोन हजार रुपये ( वार्षिक २० हजार रुपये ) वसतीगृह निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे. असे माहिती देऊन योजनेचा लाभ घेण्यात अडथळा आल्यास मदतीसाठी तुषार जगताप ९११७३७३७३ आप्पासाहेब गाड ९५०३३३६५६६ ज्ञानेश्वर जाधव
९८२२०५६०५३ प्रशांत औटे ९११६५३४४९ समन्वय साधण्यासाठी मोबाईल क्रमांक देण्यात आले आहे. त्यावेळी प्राचार्य डॉ.रामानाथ गायकवाड, महासंघाचे प्रदेश संपर्क तुषार जगताप,शहराध्यक्ष आपासाहेब गाडे,ज्ञानेश्वर जाधव, प्रशांत औटे,हेमंत मोरे, सुशील काकडे,निलेश मोरे,दादा लचके पदाधिकारी उपस्तिथ होते.