विसर्जन मिरवणूकीत डीजे-डॉल्बीवर बंदी कायम; ध्वनी प्रदुषणाच्या मुद्द्यावरून न्यायालयाचा नकार


मुंबई : गणेशोत्सवात डीजे आणि डॉल्बीवरील बंदी मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. ध्वनीप्रदुषणाच्या मुद्द्यावरुन न्यायालयाने डीजे आणि डॉल्बीला परवानगी देण्यास नकार दिला आहे. गणेशोत्सवादरम्यान डीजे आणि डॉल्बीच्या वापरावर मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली होती. या संदर्भात सरकारला आपला पक्ष ठेवण्यास सांगण्यात आले होते. त्यावर विसर्जन मिरवणुकीत डीजे सुरू झाला, की त्यावर आम्ही कारवाई करू शकतो. मात्र, त्यांना रोखू शकत नाही, असे राज्य शासनाने न्यायालयात स्पष्ट केले होते. सरकारच्या या स्पष्टीकरणानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आज आपला निर्णय देत, बंदी कायम ठेवली असून पुढील सुनावणी 4 आठवड्यानंतर होणार आहे. 

ध्वनी प्रदुषण निर्माण करणा-या साधनांना परवानगी नाहीच अशी ठाम भूमिका राज्य सरकारने कोर्टासमोर मांडली. डीजे सिस्टिम सुरू करताच ध्वनी मर्यादेची पातळी ओलांडतात, त्यामुळे परवानगीचा प्रश्‍नच उद्भवत नाही असं म्हणत विसर्जनासाठी डीजे वाजवण्याची परवाणगी मिळणार नसल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं. विसर्जन मिरवणुकीसारख्या सोहळ्यानंतर पोलीस केवळ कारवाई करू शकतात, त्यांना रोखू शकत नाहीत. पण गेल्या वर्षीच्या ध्वनी प्रदुषणाच्या 75 टक्के केसेस डीजेमुळे असल्याचं राज्य सराकरनं कोर्टात उघड केलं आहे. तर याचिकाकर्त्यांनी त्यांच्या डीजेमुळे ध्वनीप्रदुषण होणार नाही असं प्रतिज्ञापत्र लिहून द्यावं पण मुळात डीजेचा आवाज कायद्याच्या मर्यादेत राहणारा नाहीये असं मत राज्य सरकारनं कोर्टात मांडलं आहे. आम्हाला जे ध्वनी प्रदूषणासाठी खरेच जबाबदार आहे त्यावर घाला घालायचा आहे, एखाद्या डीजे ऑपरेटरसारख्या प्याद्याला अटक करुन उपयोग नसल्याची भूमिका राज्य सरकारने मांडली आहे. त्यामुळे ध्वनी प्रदुषण होऊ नये म्हणून डीजे वाजवण्यावर राज्य सरकारने कोर्टात विरोध केला.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget