Breaking News

वणीचा तपास सुरुच ; गुन्हेगार महिला मात्र ‘मोकाट’


प्रशांत हिरे/सुरगाणा :

 संपुर्ण जिल्हाभरात सध्या गुन्हेगारांचे थैमान सुरू असून पोलिस यंत्रणामात्र त्यावर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरत असल्याने नागरिक भयभित आणि चिंताग्रस्त तसेच संतप्त झाल्याचे दिसुन येत आहे. गुन्हेगारांना कुणाचाही धाक उरलेला नाही अशा मोकाट आणि बिनधास्तपणे गुन्हे केले जात आहेत. एक दोन गुन्हेगारांना पकडण्यात पोलिस यशस्वी होतात पण इतर असंख्य गुन्हांचा तपास लागु शकत नाही किंवा दीर्घकाळपर्यंत तपास सुरू राहतो माञ निष्पन्न काहीही होत नाही त्यामुळे एकूणच या तपास कामाबाबत नागरिकांच्या मनात शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे तपास सुरू आहे एवढे एकच उत्तर पोलिसांकडे तयार असते पण हा तपास थांबणार कधी गुन्हेगार गजाआड होणार कधी या प्रश्‍नांना उत्तरचं नसते परकिय शञूपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी भारतीय लष्कर दिवसराञ सीमेवर तैनात असते त्यांच्या शौर्याबद्दल देशभक्तीबद्दल तसेच कर्तव्यनिष्ठाबद्दल जनतेला संपुर्ण विश्‍वास असल्याने जनता राञी सुखाने झोप घेऊ शकते परंतु देशांतर्गत सुरक्षाव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिस खात्याबद्दल असा विश्‍वास जनतेला वाटत नाही हे एक कटु असले तरी सत्य आहे नाशिक जिल्ह्याबाबत तर अनेक घटनांचा उल्लेख करता येऊ शकतो. उदाहरणार्थ वणी येथे दिनांक 11 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 11:30 च्या सुमारास दिगंबर पांडुरंग गावित हा सुरगाणा येथील 108 रुग्णवाहिकेतून योगेश प्रभाकर राउत या रुग्णास अत्यंत तातडीने नाशिक रुग्णालयात घेऊन येत असतांना नाशिक सुरगाणा मार्गावर ओझरखेड गावाजवळ समोरून वेगात येणार्‍या वरना कार बघून रुग्णवाहिका चालकाने त्याच्या ताब्यातील गाडी वेगळ्या मार्गाने काढून घेतली मात्र काही अंतरावर जाताच पाठीमागून वरना कार या गाडीने पाठलाग करून रुग्णवाहिका अडवली व रुग्णवाहिका चालक यास गाडीतून बाहेर ओढत आम्हाला गाडी का आडवी लावली म्हणत अतिशय खालच्या भाषेत शिवीगाळ केली मात्र रुग्णवाहिकेतील रुग्णाची तब्बेत अतिशय नाजूक असल्याने त्यास रुग्णालयात पोहोचवायचे म्हणून तिथे वेळ न घालवता दिगंबर गावित याने पुन्हा रुग्णवाहिका यपुढे काढून घेतली मात्र या दोन्ही भाजपाच्या महिला कार्यकर्ता मद्यधुंद (मद्यधुंद असा आदिवासी संघटनांचा आरोप आहे.)अवस्थेत असल्याने त्या ऐकायला तयार नव्हत्या त्यांनी रुग्णवाहिका चालकास खाली ओढून मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेचा जिल्ह्यात सर्वञ निषेध होत असतांना पोलिस यंञणा माञ त्या भाजपाच्या राजकीय महिलांना झुकते माप देतांना दिसते.असा आरोप जाहीरपणे होऊ लागल्याने नागरिकांच्या मनात अविश्‍वास व शंका निर्माण होणे क्रमप्राप्त आहे.सर्वञ हीच परिस्थिती आढळत असल्याने भयप्रद स्थितीमुळे ग्रामिण भागात चिंता व्यक्त केली जात आहे. आता सहनशक्तीची मर्यादा संपल्यामुळे ते संतप्तही झाले आहेत. पोलिस अधिक्षक संजय दराडे हे नेहमीच पोलिस आधिका-यांच्या बैठका घेतात त्यात कामांबाबत अनेक सूचनाही करतात तरीही जिल्ह्यातील चिञ बदलत नाही या सर्व गोष्टींच्या कारणांचा त्यांनी शोध घ्यायला हवा गुन्हेगारीला लगाम लावायला हवा जनतेला विश्‍वास वाटेल असे काम पोलिसांनी करायला हवे यांची नोंद घेऊन आत्ता तरी चित्र बदलण्याचा प्रयत्न करावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे

...तर रस्त्यावर उतरावं लागेल

आदिवासी बांधवामार्फत वणी पोलीस स्टेशनला जाऊन विचारणा करण्यात आली व यावेळी अट्रॉसिटी व इतर कलमे लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे पोलीस सांगतात. परंतु अट्रॉसिटी दाखल करूनसुद्धा गुन्हेगार महिला मोकाट फिरत असतील, आमच्या आदिवासी समाजावर अन्याय होणार असेल तर आम्ही सहन करणार नाही या सर्वांच्या पाठीमागे असणार्‍या शासन यंत्रणेने विचार करावा मुळातच आमचा लढा कुणा एका जाती विरोधात नाही किंवा कोणत्याही पक्षाविरोधात नाही. अशी मानसिकता ठेणार्‍या प्रवृत्तीविरोधात आहे सदर महिला ह्या फक्त आपल्याला बडया नेत्यांचा पाठिंबा आहे म्हणून अजूनही बिनधास्त आहेत परंतु अजूनही आम्ही आदिवासी बांधव हे प्रकरण शांततेत हाताळतोय याचा अर्थ असा नाही की आम्ही काहीच करणार नाही आदिवासी समाजाचा उद्रेक होण्याच्या आधी त्या महिलांना अटक करून पोलीस व शासनाने आदिवासी समाजाला न्याय द्यावा अन्यथा होणार्‍या परिणामांचा विचार करावा.
सुवर्णा गांगुर्डे सभापती सुरगाणा पं.समिती