Breaking News

'शाहबाज'चा क्रिकेटमध्ये विश्वविक्रम; १० धावांत केले ८ गडी बाद


मुंबई प्रतिनिधी

नदीमने केलेली कामगिरी ही लिस्ट अ प्रकारातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. या आधीदेखील या प्रकारात भारतीयाच्या नावावरच हा विक्रम नोंदवण्यात आला होता. राहुल संघवी या दिल्लीच्या फिरकीपटूने २००१ सालीहिमाचल प्रदेश संघाविरुद्ध खेळताना १५ धावांत ८ बाली टिपण्याचा विक्रम केला होता. तो विक्रम तब्बल २० वर्षांनी मोडण्यात आला. 

झारखंडच्या डावखुरा फिरकीपटू शाहबाज नदीमने लिस्ट 'अ ' क्रिकेटमधील 20 वर्षांपूर्वीचा विक्रम आपल्या नावे केला. विजय हजारे क्रिकेट स्पर्धेत 'सी' गटातील राजस्थानविरुद्धच्या सामन्यात नदीमने 10 षटकांत 10 धावा देत 8 विकेट घेतल्या. यामध्ये त्याने 4 षटकं निर्धाव टाकली. या कामगिरीसह त्याने 1997-98 मध्ये दिल्लीच्या राहुल संघवीने नोंदवलेला विक्रम मोडला. संघवीने भारताकडून एक कसोटी व 10 वन डे सामनेही खेळलेआहेत. दिल्लीच्या या डावखुऱ्या फिरकीपटूने 1997-98 मध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये हिमाचल प्रदेशविरुद्ध 15 धावांत 8 विकेट घेतल्या होत्या.