Breaking News

दिवाळीत एसटीचा प्रवास महाग; 1 ते 20 नोव्हेंबर दरम्यान 10 % भाडेवाढ


मुंबई - दिवाळी सुट्टीच्या कालावधीत राज्य परिवहन महामंडळाने 10 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर अशी 20 दिवसांसाठी ही भाडेवाढ असेल. खासगी ट्रॅव्हल्सकडून दिवाळीवेळी दरवाढ केली जाते. त्या धर्तीवर राज्य परिवहन महामंडळानेही भाडेवाढ केली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार आहे. गत वर्षी दिवाळीच्या सुट्टीत सेवाप्रकार निहाय 20, 15 व 10 टक्के अशी भाडेवाढ करण्यात आली होती. यंदा मात्र सर्व सेवा प्रकारात एकसमान अशी 10 टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. ही भाडेवाढ 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होईल, असे स्पष्ट करण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार आहे. गत वषी दिवाळीच्या सुट्टीत सेवाप्रकार निहाय 20, 15 व 10 टक्के अशी भाडेवाढ करण्यात आली होती. यंदा मात्र सर्व सेवा प्रकारात एकसमान अशी 10 टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे.

वाढती महागाई, सततच्या इंधनदरवाढीने त्रस्त जनतेला आणखी एक झटका बसला आहे. सणासुदीच्या 20 दिवसांसाठी एसटीने तब्बल 10 टक्के भाडेवाढ केली आहे. भडकलेले पेट्रोल, डिझेलचे दर आणि आता एसटीची भाडेवाढ यामुळे चाकारमान्यांना गावी जाताना आर्थिक कसरत करावी लागणार आहे. बुधवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. त्यानंतर पाठोपाठ दसरा आणि दिवाळीचे सण आहेत. या सणांसाठी चाकरमानी आपापल्या गावी येत असतात. राज्याच्या ’लालपरी’तून गावखेड्यांमध्ये पोहोचण्यासाठी हे चाकरमानी प्रवास करत असतात. मात्र आता त्यांचा हा प्रवास चांगलाच महागला आहे. 

एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने 30 टक्केपर्यंत भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना दिला आहे. त्यानुसार दरवर्षी गर्दीच्या हंगामात (दिवाळी सुट्टीच्या कालावधीत) तात्पुरत्या स्वरूपाची भाडेवाढ करण्यात येते. दिवाळी किंवा इतर सणावाराच्या वेळी खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या ग्राहकांकडून मोठ्याप्रमाणात भाडेवाढ करतात. याविरोधात गेल्या अनेक वर्षांपासून आवाज उठवण्यात येतो आहे. परंतु, आता एसटीनेही महसूल वाढीसाठी हा पर्याय निवडला आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना याचा नाहक फटका बसणार आहे.