Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तब्बल 100 फुटांनी कमी केल्याने स्मारक वादातमुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारक पुन्हा एकदा वादात सापडले आहे. या स्मारकातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळयाची उंची कमी तब्बल 100 फुटांनी कमी करण्यात आल्याचा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे. इंदू मिलच्या सुमारे साडेबारा एकर जमिनीवर उभारण्यात येणाऱया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांनी अनेक आंदोलन केली. इंदू मिलची जमीन राष्ट्रीय वस्त्राीद्योग महामंडळाची म्हणजेच केंद्र सरकारची होती. ती गेल्या वषी राज्य सरकारच्या ताब्यात आली. दादरच्या चैत्यभूमीजवळील स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 350 फूट उंचीचा जो पुतळा उभारण्यात येणार आहे. तो तयार करण्याचे काम प्रख्यात मूर्तीकार राम सुतार यांना देण्यात आले आहे. डॉ. आंबेडकर यांचा हा जगातील सर्वात उंच पुतळा असेल. पुतळा घडवण्याचे काम राम सुतार यांच्या नॉयडा येथील स्टुडिओमध्ये तयार करण्यात येणार असून, तिथे तयार करण्यात येणाऱया डिझाइनच्या आधारे चीनमध्ये पुतळयाचा साचा बनवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. या साच्याद्वारे डॉ. आंबेडकर यांचा ब्राँझचा पुतळा तयार करण्यात येईल. याशिवाय इंदू मिलमध्ये तयार करण्यात येणाऱया स्मारकामध्ये डॉ. आंबेडकरांचा 25 फूट उंचीचाही एक पुतळा असेल. तो राम सुतार यांनी याआधीच तयार केला आहे. या स्मारकात डॉ. आंबेडकरांचा पुतळा, प्रदर्शन हॉल, चैत्यभूमीपर्यंत परिक्रमा मार्ग, बौद्ध स्थापत्य शैलीनुसार घुमट, संशोधन केंद्र, व्याख्यान सभागृह, डॉ. आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तके व ग्रंथ, त्यांच्यावरील, तसेच बौद्ध धर्माशी संबंधित जगभरातील ग्रंथ आदींचा समावेश असणार आहे.

हा पुतळा दोन वर्षांत पूर्ण व्हावा, अशी अपेक्षा आहे. हे स्मारक 14 एप्रिल 2020 पर्यंत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा होती. मात्र त्याआधीच आता पुतळ्याची उंची कमी करण्यावरून हे स्मारक वादाच्या भोवऱयात आहे. हा वाद अधिक पेटण्याची चिन्हे आहेत.