Breaking News

विराट ‘दस हजारी’ मनसबदार; सर्वांत वेगवान 10,000 धावांचा मानकरीनवी दिल्ली : भारत आणि विंडीज यांच्यात दुसरा वनडे सामना चालु आहे. या वनडेत भारताचा कर्णधार विराट कोहलीला सचिन तेंडुलकरचा सर्वात कमी डावात दहा हजार धावा करण्याचा विक्रम मोडण्याची संधी होती. विराट कोहलीने आज 81 धावा करताच त्याच्या नावे वनडेत दहा हजार धावा पूर्ण झाल्याबरोबरच सचिनचा विक्रम त्याने मोडीत काढला.

विंडीज विरुद्ध दुसर्‍या वनडेत खेळण्यापूर्वी विराटला दहा हजार धावा पूर्ण करण्यासाठी 81 धावांची गरज होती. विराटने 81 धावा करताच त्याच्या नावे सर्वात कमी डावात दहा हजार धावा पूर्ण करण्याच्या विक्रम झाला. सचिन तेंडूलकरला हा टप्पा गाठण्यासाठी 259 डाव लागले होते. विराटने 213 वनडे सामने खेळताना अवघ्या 205 डावात दहा हजार धावा केल्या आहेत. यात त्याने 36 शतकं आणि 49 अर्धशतकं झळकावली आहेत. विराटचा सर्वोच्च स्कोर 183 धावा आहे. विराटने 92.49 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली असून त्याची सरासरी 59.07 अशी आहे. विराटच्या आधी भारतीय फलंदाजांमध्ये सचिन तेंडूलकर (18,426), सौरव गांगुली (11,363), राहुल द्रविड (10,889) आणि महेंद्रसिंग धोनी (10,123) यांनाच दहा हजारांचा टप्पा ओलांडता आला आहे. विराट कोहलीचेही नाव आता या यादीत लागले आहे. विराट भारतीय फलंदाजात दहा हजार धावा करणारा पाचवा खेळाडू ठरला आहे. तर जगातील 13 वा फलंदाज ठरला आहे.