Breaking News

भिलाई स्टील स्फोटात 11 कर्मचार्‍यांचा मृत्यू; गॅस पाईपलाईनला आग लागून स्फोट


भिलाई : छत्तीसगडमधील भिलाई स्टील प्रकल्पात भीषण स्फोटाची घटना घडली आहे. या घटनेत 11 जण जागीच ठार झाले असून काही जण गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे. मृत 9 कामगार असून स्फोटावेळी प्रकल्पात कार्यरत होते. दरम्यान, मृतांचा आकडा वाढणार असल्याची भीती वर्तविली जात आहे. कोक ओव्हनला गॅस पुरवठा करणार्‍या लाईनमध्ये अचानक स्फोट झाला. यावेळी येथे काम करणारे 11 जण जागीच ठार झाले. तर अनेकजण जखमी झाले आहेत. 

भिलाई स्टील प्रकल्पाच्या प्रशासनाने याबाबत माहिती दिली की कर्मचारी हे नियमित दुरूस्तीचं काम सुरू होतं. हे काम सुरू असतानाच ही घटना घडली. घटना घडल्यानंतर लगेच बचाव दल घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं त्यामुळं मोठी हानी टळली. आग आणि त्यानंतरचा स्फोट एवढा भीषण होती की त्यात मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचार्‍यांचे शव ओळखताही येत नव्हते. दरम्यान गृहमंत्रालयाने घटनेची माहिती मागितली असून स्फोटाचं नेमकं कारण काय आहे याचीही चौकशी करण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्लाटच्या काही भागातलं काम थांबवण्यात आलं आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून पोलीस आणि प्रकल्पाचे अधिकारीही स्वतंत्र चौकशी करणार आहेत. स्टील प्रकल्पात काम करताना सुरक्षा नियमांचं पालन करण्याबाबत नियम घालून देण्यात आले आहेत. या नियमांचं पाल करण्यात आलं होतं किंवा नाही याहीची चौकशी होणार आहे.