Breaking News

प्रभाग 12 मधील स्वच्छतागृहाचे लोकार्पण संपन्न घेतली


नेवासा/प्रतिनिधी
नेवासा नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्या प्रभाग क्रमांक बारा मधील स्वच्छतागृहाचे लोकार्पण करण्यात आले. नेवासा शहर ही तीर्थक्षेत्राची भूमी असल्याने नागरिक व वारकर्‍यांच्या सेवेसाठी विविध ठिकाणी स्वच्छतागृहे कार्यान्वित करणार असल्याचे प्रतिपादन यावेळी बोलतांना नंदकुमार पाटील यांनी केले.

 नेवासा शहरातील प्रभाग क्रमांक 12 मध्ये स्वच्छता गृहाच्या झालेल्या उदघाटन प्रसंगी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्यासह मुख्याधिकारी समीर शेख कार्यालयीन अधीक्षक बबनराव राठोड, रणजीत सोनवणे, सचिन सांगळे, सचिन वडागळे, दिनेश व्यवहारे, अंबादास इरले, दत्तात्रय बर्डे, अल्ताफ पठाण, संतोष चव्हाण, प्रकाश चव्हाण, सचिन चांदणे यांच्यासह नगरपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील म्हणाले की शहरातील मुख्य चौकात मध्यवर्ती ठिकाणी हे स्वच्छतागृह बांधून पूर्ण झाल्याने नागरिक वारकर्‍यांसह महिला भगिनींची गैरसोय दूर झाली आहे. नेवासा शहर ही संताची भूमी असल्याने सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन पाहिजे त्या ठिकाणी स्वच्छतागृह बांधण्यासाठी आपण प्रयत्न करू. अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलतांना दिली.

यावेळी मुख्याधिकारी समीर शेख यांनी स्वच्छतागृहाचे महत्व विषद करून नागरिकांनी देखील कर्तव्य व जबाबदारी समजून स्वच्छ व सुंदर नेवासेनगरी साठी प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले. बबनराव राठोड यांनी आभार मानले.