Breaking News

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 13 ऑक्टोबर रोजी ?


मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेरच्या विस्ताराला मुहूर्त मिळाला असून, येत्या शनिवारी म्हणजेच 13 ऑक्टोबरला राज्य मंत्रिमंडळात खांदेपालट होणार आहे. शपथविधीचा हा कार्यक्रम विधानभवन परिसरात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा होत आहे. राज्य मंत्रिमंडळात सध्या 25 कॅबिनेट आणि 16 राज्यमंत्री आहेत. त्यामध्ये शिवसेनेच्या पाच कॅबिनेट तर सात राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. शिवसेनेच्या कोट्यातील एक जागा अजूनही भरायची आहे. त्याचवेळी भारतीय जनता पार्टीच्या तीन जागा भरायच्या आहेत. राज्यातील फडणवीस सरकारची मुदत आणखी एक वर्ष आहे. त्याआधी मार्च-एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुकाही होण्याची शक्यता आहे. अशावेळी मंत्रिमंडळाचा हा संभाव्य विस्तार व खांदेपालट अखेरचा ठरण्याची शक्यता आहे. रविवारीच मुख्यमंत्री राजधानी दिल्लीत गेले होते. तेथे त्यांनी पक्षाच्या काही नेत्यांशी चर्चा केल्याचे समजते.