Breaking News

रुपयाची डॉलरच्या तुलनेत 14 पैशांची घसरण


मुंबई - सोमवारी सकाळी बाजाराला सुरुवात होताच रुपयाची घसरण पाहायला मिळाली. 14 पैशांची घसरण होऊन डॉलरच्या तुलनेत रुपया 73.90 रुपयावर स्थिरावला.

देशाअंतर्गत अर्थव्यवस्थेला मजबूती देण्यासाठी चीनने आपल्या मध्यवर्ती बँकेचे धोरण सैल केले. त्यानंतर जागतिक बाजारपेठेत डॉलरच्या मुल्यात वाढ झालेली दिसून आली. चीनच्या मध्यवर्ती बँकेने रविवारी घोषणा केली की, 15 ऑक्टोबरपासून बँकेच्या राखीव निधी गुण्णोत्तरात एक टक्क्याने कपात करणार आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणजे ही बँक चीनच्या बँकिग व्यवस्थेत तब्बल 109.2 बिलियन अमेरिकन डॉलर नव्याने बाजारात आणणार आहे. जगातील क्रमांक दोनची अर्थव्यवस्था असलेल्या चीनचा अमेरिकेशी पंरपरागत व्यापारी संघर्ष सर्वश्रूत आहे. परदेशी गुंतवणूकदारांच्या म्हणण्यानुसार, जगातील इतर चलनांशी तुलना करता डॉलरच्या किंमतीत झालेली वाढ ही भारतीय रुपयावरही परिणाम करणारी आहे. शुक्रवारी, रुपयात 18 पैशांची घसरण होऊन 73.76 वर स्थिरावला. आरबीआयने आपल्या पत धोरणात कुठलाही बदल न करण्याच्या निर्णयानंतर रुपया 74.23 या (दिवसभरातील निचांकी पातळी) स्तरावर दिसून आला. या घडामोडीनंतर विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय भांडवली बाजारातून 9, 300 करोड म्हणजेच 1.3 बिलियन अमेरिकी डॉलर काढून घेण्याचा निर्णय घेतला तर, बॉम्बे स्टॉक मार्केटचा मुख्य निर्देशांक सेंसेक्सची घसरणही सुरुच राहिली.