Breaking News

179 तालुक्यांत लवकरच दुष्काळ जाहीर करणार

दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या तालुक्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील 179 तालुक्यांत लवकरच दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे, असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं आहे. दुष्काळ जाहीर झाल्यास कोणत्या सवलती मिळणार? ज्या तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात येईल त्या तालुक्यांतील महसूल वसुली, शेतकऱ्यांचं वीज बिल आणि शैक्षणिक शुल्क वसुलीलाही स्थगिती देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. नाशिकमधील मांगीतुंगी इथं एका संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळात होळपणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय.