Breaking News

राज्यात 180 तालुक्यात दुष्काळ जाहीर; उपाययोजना राबविण्यासाठी सरकार कटिबध्द : मुख्यमंत्रीमुंबई : राज्यात 180 तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य स्तिथी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर जाहीर केले. दुष्काळाशी सामना करण्यासाठी राज्यात 8 उपाययोजना राबवणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे जमीन महसूल सूट, कृषी कर्ज वसुली स्थगिती, वीज खंडित न करणे, विध्यार्थ्यना शालेय खर्चात सूट, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात सूट, शेतकर्‍यांच्या शेती पंपाची वीज खंडित न करणे, या उपाय योजना सुरू केलेल्या आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मान्सून राज्यातून माघारी फिरला असून सरासरीच्या तुलनेत 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस यंदा पडला आहे. शासकीय पातळीवरून दुष्काळ निश्‍चितीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात गतवर्षीच्या तुलनेत 10.17 टक्क्यांची तूट दिसून येत आहे. केंद्राने दिलेल्या निर्देशानुसार, दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तालुकानिहाय प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. केंद्राकडून राज्याला त्यासंदर्भात निर्देश जारी करण्यात आले आहेत. दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यापूर्वी केंद्रीय पथक राज्याचा दौरा करणार आहे. मराठवाड्यात सरासरीच्या 75 टक्क्यापेक्षा कमी पाऊस झाला आहे. शेतातील कापूस, मका, मूग, तूर ही पीके पाण्याअभावी करपू लागली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत 359 मिलिमीटर पाऊस झाला असून हे प्रमाण अपेक्षित सरासरीच्या केवळ 69 टक्के आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील 3226 धरणात 40,828 ( मिलियन क्यूबिक मी) पाणीसाठा आहे. टक्केवारीत पाण्याचे प्रमाण 64 टक्के इतके नोंदविले गेले आहे. गेल्यावर्षी हा पाणीसाठा 74.62 टक्के इतका आहे. सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील 965 धरणांमध्ये 1976 (मिलियन क्यूबिक मी) म्हणजे 28.60 टक्के इतका पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी हे प्रमाण 65.49 टक्के इतके होते. महसूल विभागाने 355 तालुक्यांपैकी 170 तालुक्यात दुष्काळी स्थिती असल्याचे म्हटले आहे.

उपाययोजना सुरू करण्यात येणार 

दुष्काळ जाहीर करण्याचे निकष केंद्र सरकारने ठरवलेले आहेत. राज्यात असलेल्या दुष्काळ सदृश्य स्थितीची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्रीय पथक राज्यात येणार आहे. या पथकाने पाहणी केल्यानंतरच केंद्रीय मदत जाहीर होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दुष्काळ सदृश्य स्थितीत वीज बिल, कृषी पंप बिल पाणी पुरवठा आणि जनावरांच्या छावण्यांसंदर्भात मदत पुनर्वसन विभागात मदतीची तरतूद आहे. याबाबतचे निकष लावून 180 तालुक्यांमध्ये उपाययोजना सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती असलेल्या तालुक्यात जामखेड, कर्जत, नगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, राहाता, राहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा या तालुक्यांचा समावेश