Breaking News

जम्मूत अपघात, 20 ठार, 13 जखमी

वृत्तसंस्था - जम्मू काश्मीर येथील रामबन जिल्ह्यातील बनिहाल या ठिकाणी प्रवासी बस कोसळून अपघात झाला. यात 20 जणांचा ठार झाले असून 13 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिक व प्रशासन यांच्याकडून घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. तर पोलीस दलाची तुकडी देखील तेथे पोहचली असून पुढील कायदेशी कारवाई सुरू केली आहे. जम्मू सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना 50 हजारांची नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचीही घोषणा केली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.