Breaking News

‘एफआरपी’चे काही कारखान्यांकडे 220 कोटी थकबाकी


पुणे : गळीत हंगाम पुढील आठवड्यापासून सुरू होत आहे. त्यात राज्यातील 12 साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील एफआरपी’’ अर्थात रास्त आणि किफायतशीर किंमतीचे पैसे शेतकर्‍यांना दिलेले नाही. काही कारखान्यांकडे मिळून तब्बल 220 कोटी रुपयांची थकबाकी आहे. ती मिळाल्याशिवाय गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही, अशी भूमिका आता शेतकर्‍यांनी घेतली आहे.गेल्या वर्षी उसाचे विक्रमी उत्पादन झाल्याने गळीत हंगाम मेअखेर सुरू होता. साखर निर्मितीत महाराष्ट्राने विक्रम केला. तर, दुसरीकडे शेतकर्‍यांना अनेक कारखान्यांनी अजून एफआरपी’चे पैसे दिले नाहीत. नंतर देऊ’, हप्त्या-हप्त्याने देऊ,’’ असे सांगत साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांना झुलवत ठेवले आहे. आता तर 20 ऑक्टोबरपासून चालू वर्षीचा गळीत हंगाम सुरू होत आहे. या वर्षीच्या एफआरपी’’बाबत चर्चा करण्यापूर्वी शेतकरी आता थकीत एफआरपी’’ आधी देण्याची मागणी करत आहेत.