संगमनेरच्या 25 युवकांनी डोंगरदर्‍यातुन घोडेस्वारी करत गाठला विश्रामगडसंगमनेर/प्रतिनिधी

संगमनेरच्या प्रवरेकाठी असलेली ऐतिहासिक भवानीबाग ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहवासाने पवित्र झालेल्या अकोले तालुक्यातील पट्टा किल्ला अर्थात विश्रामगड या दोन दिवसीय 60 किलोमीटर अश्‍वारोहण मोहिमेचे आयोजन रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली 25 युवकांनी डोंगरदर्‍यातुन घोडेस्वारी करत ऐतिहासिक पट्टा किल्ला सर केला. 

संगमनेर अश्‍वप्रेमी असोसिएशन व शिवराय निर्माण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दुसर्‍या वर्षी या अश्‍वस्वारीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अध्यक्ष रणजितसिंह देशमुख , विकी जगताप, माजीद शेख, दिलीप साबळे, गिरीश शेलुकर, शबीर शेख, रामा निघुते, संजय वर्पे, मच्छिंद्र सानप, ज्ञानेश्‍वर सुपेकर, लक्ष्मण कोटकर, संदीप दिघे यांनी डोंगर टेकड्यांवरुन झाडा वनातून घोडेस्वारी करत हा विश्रामगड गाठला. याप्रसंगी नानासाहेब जाधव, रफीक फिटर, मकरंद मुळे, बैरागी सर, विलास कवडे, अजित देशमुख, किरण गुंजाळ, भाऊसाहेब खेमनर, पैय्याम शेख हे समवेत होते. हा अनुभव शिवकाळातच घेऊन गेल्याचे मोहिमेत सहभागी झालेल्या अश्‍वारोहकांनी सांगितले. राजहंस दुध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी संगमनेर अश्‍वप्रेमी असोसिएशन व शिवराय निर्माण संघटनेची स्थापना केली. त्या माध्यमातून तालुक्यातील हिवरगांव पावसा (देवगड) येथे माघ पोर्णिमेच्या दिवशी भरणार्‍या मल्हारी मार्तंड खंडेरायाच्या यात्रौत्सवात गत सहा वर्षांपासून अश्‍वप्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. ऐतिहासिक काळात अश्‍वांना विशेष महत्व होते. आधुनिक काळातही तरुणांना अश्‍वाचे आकर्षण आहे. मात्र त्याबद्दल फारशी माहिती नसते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पराक्रमात अनेक मोहिम, लढाया जिंकतांना त्यांना अश्‍वाची खूप मदत झाली. तसेच त्यांच्यासाठी जीवावर उदार होऊन शौर्यगाथा रचलेले अनेक सरदार हे त्यांच्याकडील असलेल्या अश्‍वांमुळेच यशस्वी ठरले. त्यामुळे शिवकालीन ऐतिहासिक गोष्टींना उजाळा देण्यासाठी गत दोन वर्षांपासून अश्‍वारोहणाचे आयोजन करण्यात येते. पहिल्या वर्षी संगमनेर तालुक्यातील पेमगिरी ते शिवनेरी गड या 65 किलोमीटरच्या अश्‍वारुढ प्रवासाचे तर यंदा 20 ते 21 ऑक्टोबर दरम्यान संगमनेरातील भवानीबाग ते अकोले तालुक्यातील पट्टा किल्ला विश्रामगड या दोन दिवसीय 60 किलोमीटरच्या अश्‍वारोहणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात 25 अश्‍वारोहक त्यांच्या जातीवंत अश्‍वांसह सहभागी झाले होते. शनिवारी सकाळी सात वाजता भवानी बाग येथून घोडेस्वारीला सुरुवात करत डोंगर टेकड्यांवरुन झाडा वनातून दोन दिवसांचा प्रवास करत रविवारी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास अश्‍वारोहक विश्रामगडावर पोहचले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याास पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन केल्यानंतर पोवाड्याचा कार्यक्रमानंतर अश्‍वारोहण मोहिमेचा समारोप करण्यात आला. यावेळी राजेंद्र देशमुख, विलास शिंदे, किसन खेमनर, बाबा थोरात , सुनिल गुळवे, प्रकाश नवले, तान्हाजी शिंदे, सुनिल शिंदे उपस्थित होते. यावेळी गणेश महाराज वाघमारे, ओतुर व शाहीर सौरभ हराळ, शिवव्याख्याते यांचे यावेळी व्याख्यान झाले. 

बेगम व अग्रेसरचा सहभाग
रणजितसिंह देशमुख यांना अश्‍वारोहणाचा विलक्षण छंद आहे. गतवर्षी लोणावळा येथे झालेल्या राष्ट्रीय अश्‍वारोहण स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक मिळविले. संगमनेर ते पट्टा किल्ला या अश्‍वारोहण मोहिमेत बेगम व अग्रेसर या त्यांच्या दोन उत्तम अश्‍वांसोबतच भारतीय वंशाच्या विविध जातीचे उमदे अश्‍व सहभागी झाले होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget