वृत्तपत्रविक्रेते आंदोलनाच्या पवित्र्यात - 26 ऑक्टो.पासून पुरवणी बंद सप्ताह


ठाणे : प्रतिनिधी

वृत्तपत्राचाच अविभाज्य भाग असलेला वृत्तपत्र विक्रेता आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.सणासुदीला येणारे भरमसाठ पुरवण्याचे गठ्ठे उचलताना वृत्तपत्र विक्रेता सध्या मेटाकुटीला आला आहे.तेव्हा,वृत्तपत्रातील पुरवणीची भरणावळ करण्यासाठी योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांनी येत्या 26 ऑक्टोबरपासून पुरवणी बंद सप्ताह पाळण्याचा इशारा दिला आहे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्राचा वृत्तपत्रविक्रेता हा खरा कणा मानला जातो.मात्र,वृत्तपत्रविक्रेता हा घटकच सध्या दुर्लक्षित राहिला असल्याचा टाहो वृत्तपत्र विक्रेत्यांच्या संघटना फोडत आहेत.मराठी वर्तमानपत्रांनी पुरवणीचे 10 पैसे तर इंग्रजी वर्तमानपत्रांनी पुरवणीचे 20 पैसे द्यावे अन्यथा पुरवणी भरून द्यावी.अशी वृत्तपत्र विक्रेत्यांची मागणी होती. गेले काही महिने या विषयावर विविध विक्रेता संघटनांच्या प्रतिनिधींशी वर्तमानपत्रांची चर्चा सुरू होती.1 एप्रिलपासून पुरवणी भरणावळ मोबदला वाढणे अपेक्षित होते.पण गेले सहा महिने यावर निर्णय न झाल्यामुळे आता येत्या 26 ऑक्टोबरपासून पुरवणी न टाकण्याचा निर्णय वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सर्व संघटनांनी घेतला आहे.वृत्तपत्र विक्रेत्यांना पुरवणी भरण्याचा योग्य मोबदला मिळत नसल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्तपत्र विक्रेत्यांनी सांगितले.



Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget