जम्मू काश्मीरमध्ये 2 दहशतवादी ठार


श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. श्रीनगरबाहेरील सूथू नौगाम परिसरात ही चकमक सुरू आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. त्यांचे मृतदेह सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले आहेत.

आज सकाळपासूनच ही चकमक सुरू असून दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू आहे. या घटनेनंतर परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. दहशतवाद्यांकडून हत्यारे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. तसेच, नागरिकांना या परिसरात न फिरकण्याचा इशारा सुरक्षा दलांनी दिला आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget