काश्मीरमध्ये रेड अलर्ट जारी; काश्मीर खोर्‍यात 300 दहशतवादी सक्रिय; लष्कराने सर्च ऑपरेशन सुरु


श्रीनगर : काश्मीर खोर्‍यात जवळपास 300 अतिरेक्यांच्या सक्रीय हालचाली सुरु आहेत. यापैकी 250 दहशतवादी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती लष्करी सूत्रांकडून देण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर काश्मीरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी लष्कराकडून कोणतीही कसर सोडली जाणार नाही. लष्कर, पोलीस, सीआरपीएफसह सर्व दलांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. दहशतवाद्यांना खोर्‍यात घुसखोरी करण्यापासून रोखण्यासाठी लष्कराने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. सोमवारपासून चार टप्प्यांत स्थानिक निवडणुका होणार आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार न पाडण्यासाठी पाकिस्तानकडून काही आगळीक केली जाण्याची शक्यता आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांततेत, निर्विघ्नपणे पार पडाव्यात यासाठी चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. सुरक्षेचे उपाय म्हणून गाड्यांच्या तपासणीसह संशयित व्यक्तींवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. तसेच चौक्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. 
दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय सैन्य तैनात करण्यात आल्याची माहिती लेफ्टनंट जनरल ए. के. भट यांनी प्रसारमाध्यमांना दिली. काश्मीर खोर्‍यात असलेल्या गावातील लोकांचाही भारतीय सैन्याला पाठींबा आहे. त्यामुळे या भागातील दहशतवादाचा आम्ही पूर्णपणे नाश करू, असेही भट म्हणाले. स्थानिक निवडणुका व्यवस्थित पार पडाव्यात म्हणून पोलीस आणि ’केंद्रीय रिझर्व पोलीस फोर्स’ प्रयत्न करत आहेत. याठिकाणी होणार्‍या स्थानिक निवडणुका शांततेत पार पाडण्याचा आमचा हेतू असल्याचेही भट म्हणाले. त्यासाठी पोलीस आणि केंद्रीय रिझर्व पोलीस रात्रं-दिवस प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले. येत्या 8 ऑक्टोबरपासून जम्मू-काश्मीरमधील 4 नागरी स्थानिक संस्थांच्या निवडणुकांना सुरुवात होणार आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget