बनावट गुणपत्रिका बनवणारी टोळी गजाआड; मुंबई विद्यापीठाच्या 4 कर्मचार्‍यांना अटक


मुंबई : जिल्ह्यात बनावट गुणपत्रिका बनवणार्‍या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. बनावट गुणपत्रिका बनवून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळणार्‍या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले. रत्नागिरी पोलिसांनी फिनोलेक्स महाविद्यालयातून आलेल्या तक्रारीवरून ही कारवाई केली आहे. या घटनेत मुंबई विद्यापीठाच्या 4 कर्मचार्‍यांना अटक करण्यात आली असल्याने शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे. या घटनेने विद्यापीठाच्या पारदर्शकतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केला जात आहे. रत्नागिरी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत एका विद्यार्थ्यासह एकूण 6 जणांना अटक केली आहे. पोलीस उपअधिक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश कदम, पोलीस उपनिरीक्षक मढवी यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि पहिल्यांदा सुयशला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. सुयशकडून विनेश हळदणकर आणि विनेशकडून मुंबई विद्यापीठातील गोरखनाथ गायकवाडची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर या प्रकरणाचे आणखी धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. त्यानंतर पोलिसांची टीम मुंबईत गेली. या टीमने मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील क्लार्क गणेश मुणगेकर, शिपाई प्रविण वारीक, आणि महेश बागवे यांना ताब्यात घेतले. त्यामुळे या प्रकरणात एकूण 6 जणांना रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान या प्रकरणाची व्याप्ती पाहता बनावट प्रमाणपत्र देण्याचं हे रॅकेट आणखी मोठे असण्याची शक्यता आहे. पण अशा या रॅकेटमध्ये खुद्द मुंबई विद्यापीठाचे कर्मचारीच सहभागी असल्याने विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचे वाभाडे निघत आहेत. विद्यापीठाच्या प्रत्येक विभागात असा गोरख धंदा चालत तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे आता गरज आहे, ती अशा रॅकेटचे जाळे उद्धवस्त करण्याची, पण यासाठी मुंबई विद्यापीठ मानसिकता दाखवेल का? हा गंभीर प्रश्‍न आहे. Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget