Breaking News

कार्ती चिदंबरमांना ईडीचा दणका; तब्बल 54 कोटींच्या संपत्तीवर टाच


नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया प्रकरणी कार्ती चिदंबरम यांच्या 54 कोटी रुपयांच्या संपत्तीवर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) टाच आणली आहे. यामध्ये कार्ती यांच्या भारत, युनायटेड किंग्डम आणि स्पेनमधील संपत्तीचा समावेश आहे. ईडीकडून जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये कार्ती चिदंबरम यांचे दिल्लीतील घर, उटी आणि कोडिकनालमधील अलिशान बंगला, यूकेतील घर आणि बार्सिलोनातील संपत्तीचा समावेश आहे. ‘आयएनएक्स मीडिया’ या पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या कंपनीला 2007 मध्ये परकीय गुंतवणुकीच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी बेकायदा पद्धतीने मदत केली, असा कार्ती यांच्यावर आरोप आहे. आपल्या वडिलांच्या तत्कालीन अर्थमंत्रिपदाचा गैरवापर करून कार्ती यांनी नियमबाह्य परकीय गुंतवणूक केलेल्या ‘आयएनएक्स मीडिया’ची मदत केली. याबदल्यात स्वत:च्या बेनामी कंपन्यांमार्फत कोट्यवधी रुपयांचा लाभ घेतल्याचा दावा सीबीआयने केला होता.